फलटण:-धुमाळवाडी येथे ‘फळबाग लागवड- चौरस मांडणी पद्धत’ प्रात्यक्षिक संपन्न.
संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
धुमाळवाडी येथे ‘फळबाग लागवड- चौरस मांडणी पद्धत’ प्रात्यक्षिक संपन्न.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ,राहुरी संचलित कृषि महाविद्यालय,फलटण येथील कृषिकन्यांनी ग्रामीण कृषि कार्यानुभव उपक्रम २०२२-२३ अंतर्गत धुमाळवाडी येथे ‘फळबाग लागवड- चौरस मांडणी पद्धत’ या विषयाचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांसमोर सादर केले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना सिताफळाची रोपे या पद्धतीत लावून दाखवली.तसेच या लागवड पद्धतीचे फायदे शेतकऱ्यांना सांगितले.या कार्यक्रमासाठी
प्राचार्य डॉ.एस.डी. निंबाळकर,प्रा.एन.एस.ढालपे, प्रा.एस.वाय.लाळगे,प्रा.एन.ए.पंडित आणि विषय शिक्षक प्रा. एस.एस.आडत यांचे कृषिकन्या ऋतुजा पवार,प्राची व्यवहारे,महेश्वरी मांजरे,ऋतुजा आवारे,ऋतुजा रणवरे,तेजस्विनी शिंदे,स्नेहल शिंदे यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले.