आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-‘किसन वीर’ च्या प्राध्यापकांची संशोधन क्षेत्रात भरारी.

पत्रकार रेखा येवले सातारा जिल्हा महिला कार्याध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई:-‘किसन वीर’ च्या प्राध्यापकांची संशोधन क्षेत्रात भरारी.

वाई: दि. २९ सप्टेंबर २०२६
येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभागातील डॉ. अश्विनी शेवाळे, शरद चव्हाण आणि जोत्स्ना रेंजर यांनी विकसित केलेल्या *अ कॉम्पॅक्ट मोलेक्युलर सॅम्पल प्रोसेसिंग अँड जीन एक्स्प्रेशन विझुअलायझेशन युनिट* या नावीन्यपूर्ण व कार्यक्षम उपकरण पद्धतीला भारत सरकारकडून पेटंट प्राप्त झाले आहे.
हे उपकरण रुग्णांच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे. ते घटनेच्या ठिकाणीच जैविक नमुने गोळा करून त्यावर प्रक्रिया करते आणि शरीरातील जनुके कशी कार्य करतात, याचा थेट निकाल स्क्रीन वरती दाखवते. यामुळे जनुकीय माहितीचे (जीन एक्स्प्रेशन) वाचन आणि भाषांतर, रेणूची प्रक्रिया (मोलेक्युलर प्रोसेसिंग) आणि निर्मिती प्रक्रियेच्या दृष्यीकरण म्हणजेच पेशींच्या पातळीवर नेमके काय घडत आहे, याचा अभ्यास करणे शास्त्रज्ञांना सोपे जाणार आहे, तसेच या पेटंटमुळे वैद्यकीय आणि औषधनिर्मिती क्षेत्राला मोठा फायदा होईल असे संशोधकांचे मत आहे. हे तंत्रज्ञान वैद्यकीय प्रयोगशाळांमधील अंतर कमी करून थेट रुग्णांपर्यंत आणि सर्वसामान्यांपर्यंत अचूक आणि वेगवान पद्धतीने पोहोचेल असा त्यांचा दावा आहे.
डॉ. अश्विनी शेवाळे व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी या पेटंटबरोबर यापूर्वीही एक भारतीय पेटंट मिळविले आहे त्याचा विषय “बायो-सेन्सर डिवाइस फॉर डिटेक्टिंग झोनोटिक टोक्सिन्स इन ह्यूमन बायोलॉजिकल सॅम्पल्स” हा असून, त्याचे देखील समाजाच्या दृष्टीने महत्त्व आहे. हे उपकरण मानवी रक्त, लाळ किंवा इतर जैविक नमुन्यांमधील झुनोटिक विष तात्काळ शोधण्यास मदत करेल. कोविडनंतर झुनोटिक आजारांचे प्रमाण वाढले असून लवकर निदान झाल्यास उपचार करणे सोपे होणार आहे.
या संशोधनाविषयी बोलताना संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले म्हणाले, ‘आमच्या महाविद्यालयाला संशोधनाची फार मोठी परंपरा असून, प्राणिशास्त्र विभागाने या पेटंटच्या माध्यमातून संशोधनाच्या क्षेत्रात घातलेली नाविन्यपूर्ण भर ही समाजाच्या व वैद्यकीय क्षेत्राच्या दृष्टीने मौलिक आहे. या यशाबद्दल जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले, उपाध्यक्ष शंकरराव गाढवे, सचिव डॉ. जयवंत चौधरी, खजिनदार प्रा. नारायणराव चौधरी सर्व संचालक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, उपप्राचार्य प्रो.डॉ. विनोद वीर, प्राध्यापक, कर्मचारी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button