कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पारनेर:-शासकीय टँकरच्या प्रतीक्षेत न राहता फाउंडेशनचा पुढाकार!  अंकुशराव रोकडे पाटील फाउंडेशनतर्फे गावात मोफत पाणीपुरवठा सुरू.

पत्रकार राजेंद्र चितळकर पारनेर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) पारनेर:-शासकीय टँकरच्या प्रतीक्षेत न राहता फाउंडेशनचा पुढाकार!  अंकुशराव रोकडे पाटील फाउंडेशनतर्फे गावात मोफत पाणीपुरवठा सुरू.

पारनेर प्रतिनिधी राजेंद्र चितळकर :
शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा मिळविण्यासाठी असलेल्या क्लिष्ट प्रशासकीय प्रक्रियेमुळे होणारा विलंब आणि त्याचा ग्रामस्थांना सहन करावा लागत असलेला त्रास लक्षात घेऊन श्री. अंकुशराव रोकडे पाटील फाउंडेशनने सामाजिक बांधिलकी जपत मोफत पाणीपुरवठा सुरू केला आहे.
काल रात्रीपासून गावातील पाणीपुरवठा टाकीत टँकरद्वारे पुरेसे पाणी भरण्यात आले असून, आज महादेव वस्ती तसेच तुकाई वस्ती येथे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
पाण्याची गरज असताना प्रशासकीय प्रक्रियेला लागणाऱ्या वेळेची वाट न पाहता फाउंडेशनने तातडीने पुढाकार घेत ग्रामस्थांना दिलासा दिला आहे. त्यामुळे तहानलेल्या गावाला मोठा आधार मिळाला असून, ग्रामस्थांकडून या सामाजिक उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे.
ग्रामस्थांच्या अडचणीच्या काळात तत्परतेने धावून येत मोफत पाणीपुरवठा सुरू केल्याबद्दल श्री. अंकुशराव रोकडे पाटील फाउंडेशनचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

2) श्रीगोंदा:-“१७५० विवाह जुळवून दिले, सर्वच यशस्वी! सामाजिक कार्याची दखल घेत सुभाष ढवळे यांचा ज्ञानेश्वरी ग्रंथ देऊन सन्मान”

श्रीगोंदा तालुक्यातील अढळगाव येथील ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते श्री महेंद्र शिंदे आणि प्रवचनकार ह. भ. प. श्री ज्ञानदेव माऊली काळे महाराज यांच्या सहकार्यालय अढळगाव येथील श्री सिद्धेश्वर देवस्थान मंदिर प्रांगणात एका कार्यक्रमात ढवळे वधु वर सुचक श्रीगोंदा अध्यक्ष सुभाष ढवळे यांच्या सामाजिक कार्याबद्दल आणि अनेक पुरस्कार मिळविल्याबद्दल महाराष्ट्रासह इतरही राज्यातील मुला मुलींना विश्वासात घेऊन सर्वधर्मीय मुला मुलींचे १७५० विवाह जमवून दिलेले आहेत तेही सर्व यशस्वी झालेले आहेत याच कार्याबद्दल ग्रामस्थ मंडळी यांच्या वतीने ढवळे वधू वर सूचक श्रीगोंदा अध्यक्ष सुभाष ढवळे यांचा ज्ञानेश्वरी ग्रंथ देऊन ग्रामस्थ यांच्यावतीने सामाजिक कार्यकर्ते श्री महेंद्र शिंदे प्रवचनकार ह. भ . प. ज्ञानदेव माऊली काळे आणि सर्व ग्रामस्थ यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ देऊन सन्मान केला आहे केला या कार्यक्रमाच्या वेळी अढळगाव पंचक्रोशीतील मान्यवर आणि उपस्थित जनसमुदाय होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवचनकार ह भ .प . श्री ज्ञानदेव महाराज काळे यांनी केले यावेळी सत्कारला उत्तर देताना ढवळे वधु वर सुचक चे अध्यक्ष सुभाष ढवळे यांनी ग्रामस्थांचे आणि पंचक्रोशीतील आलेले उपस्थित होते यावेळी ढवळे वधु वर सुचक श्रीवांत अध्यक्ष सुभाष ढवळे यांनी सत्कार ला उत्तर देताना महाराष्ट्रासह इतर राज्यातील समाज बांधवांनी आणि मुला मुलीच्या पालकांनी माझ्यावर जो विश्वास व्यक्त करून मला सहकार्य केले आहेत त्याबद्दल सर्वांचे मी आभारी आहे आपण दिलेले हे प्रेम असेच राहू द्या मी आपल्या विश्वासाला त्याला जाऊन देणार नाही अशी ग्वाही अध्यक्ष सुभाष ढवळे यांनी दिली यावेळी पंचक्रोशीतील अनेक मान्यवर आणि मोठा जनसमुदाय उपस्थित होता

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button