श्रीरामपूर:-दुष्काळामुळे शून्य उत्पादन (ziro yield) माळेवाडी चे शेतकरी ज्ञानेश्वर औताडे यांनी उभ्या सोयाबीन वर फिरवला रोटावेटर !!
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

श्रीरामपूर:-दुष्काळामुळे शून्य उत्पादन (ziro yield) माळेवाडी चे शेतकरी ज्ञानेश्वर औताडे यांनी उभ्या सोयाबीन वर फिरवला रोटावेटर !!

श्रीरामपूर तालुक्यात गेल्या दोन महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या खरीप हंगाम पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे सुरुवातीच्या झालेल्या पावसाच्या भरोशावर शेतकऱ्यांनी कर्ज काढून सोननान गहाण ठेवून खरीप हंगाम पिकांचे बी, भरन, खते, औषधे इत्यादीसाठी खर्च केला परंतु गेल्या दोन महिन्यापासून नगर जिल्ह्यात व श्रीरामपूर तालुक्यात पावसाने शेतकऱ्यांना ठेंगा दाखवला पावसा अभावी उभी पिके करपून गेली जी पिके उगवली त्या पिकांची पावसाभावी वाढच झाली नाही खरीप पिकांना फुले लागण्याच्या वेळीच पावसाने दगा दिला त्यामुळे खरीप पिकांची पुढची वाढ खुंटली आहे पिके जागेवर जळून गेली दुष्काळामुळे यावर्षी शेतकऱ्यांच्या हाती शून्य उत्पादन (ziro yield) पडले शेतामध्ये फक्त सोयाबीनला फक्त पालाच आहे त्याला शेंगा लागल्या नाहीत अशा सोयाबीनची काढणी खर्च सुद्धा परवडणारा नसल्याने शेतकरी आपल्या उभ्या पिकांवर रोटावेटर मारीत आहेत . यावर्षी पडलेला भीषण दुष्काळामुळे तमाम शेतकरी संकटात सापडले आहेत त्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत अशी शेतकऱ्यांची मागणी आहे, शासनाने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यकाळात नगर जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढतील याची शासनाने दखल घ्यावी व त्वरित शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी दुष्काळी नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.
ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION


