आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मायणी येथे संत सद्गुरु सरुताई यांचा रथोत्सव प्रचंड उत्साहात संपन्न.

ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

मायणी येथे संत सद्गुरु सरुताई यांचा रथोत्सव प्रचंड उत्साहात संपन्न.

 

मायणी येथे श्री संत सद्गुरू सरुताई माऊलींच्या १४ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या सोहळ्यासाठी सौ. सोनिया जयकुमार गोरे (वहिनीसाहेब) ,माजी आमदार डॉ.दिलीपराव येळगावकर,आमदार धैर्यशील कदम आणि उपस्थित मान्यवरांनी रथपूजन करून पारंपरिक रथोत्सवाला उत्साहात सुरुवात केली. सालाबादप्रमाणे यंदाही माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन केले. रथोत्सवाच्या निमित्ताने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून माऊलींच्या दर्शनासाठी आणि आशीर्वादासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली.

याप्रसंगी सौ. उर्मिला दिलीपराव येळगावकर, अभिजित दादा येळगावकर, भाजपा महिला मोर्चा उपाध्यक्ष सौ. रेणू अभिजित येळगावकर, जिल्हा परिषद सदस्य ॲड. सुरजदादा शिवाजीराव पाटील, सभापती सौ. वनिता दुबळे, पंचायत समिती सदस्य प्रसाद (राजूकाका) जुगदर, माण-खटाव विधानसभा भाजपा निवडणूक प्रमुख विक्रमसिंह (सोमनाथ) भोसले, विधानसभा संयोजक विशाल बागल,सातारा जिल्हा भाजपाचे उपाध्यक्ष डॉ.सुरेशशेठ शिंदे, मायणी भाजपा शहराध्यक्ष जालिंदर माळी,संजय बागल, संजय गुदगे,मानसिंगराव देशमुख,अरुण चोथे यांच्यासह सद्गुरू सरुताई माऊली ट्रस्ट मठाचे विश्वस्त व पदाधिकारी, खटाव तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, मान्यवर तसेच परिसरातील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रथपूजनानंतर सुरू झालेल्या रथोत्सवात भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला असून माऊलींच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला आणि संपूर्ण वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले आहे.रथ व पालखी सोहळा गावातून वाजतगाजत वाद्यांच्या निनादात पार पडला. रथ सोहळ्यासाठी भाविकानी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा जयघोष करत रथ सोहळा पार पडला. या रथ सोहळ्यास सुरुवात होण्यापूर्वी ट्रस्टचे चेअरमन व माजी आमदार डॉ.दिलीपराव येळगावकर म्हणाले,पहाटे ४:३२वाजता फुलांच्या कार्यक्रमप्रसंगी भाविकांनी अलोट गर्दी केली होती. दरवर्षी ही गर्दी वाढतच आहे.ही आनंदाची बाब आहे.असे सांगून सरुताईंचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असल्याचे सांगून आम्ही सर्व कुटुंबियांनी सद्गुरु सरुताई यांच्या सेवेत राहायचे ठरवले आहे.आमच्या देवस्थानात आम्ही राजकारण करत नाही. येथे सर्वांना प्रवेश आहे.यावेळी मायणी अर्बन बँकेचे संचालक संदीप माळी यांनी २५ हजार५००रुपये रथासाठी अर्पण केले,त्यांचा सत्कार करण्यात आला.संजय बागल यांनी ७७हजार७७७ रुपये अर्पण केले.त्यांचा व अन्य देणगीदार व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. क वर्गातून देवस्थानला ब वर्ग दर्जा मिळाल्यामुळे ४कोटी मिळणार असून भव्य सभामंडप, भव्य सभामंडप सोलर सिस्टीम,सुशोभिकरण करण्यात येईल तसेच जागेचा वाद सामंजस्याने मिटवून ट्रस्टला ऊर्जितावस्था प्राप्त करुन देणार, असेही येळगावकर म्हणाले. पालखी व रथ सोहळा मिरवणुकीत उंट व घोडे यांचा समावेश होता. ट्रस्टचे सचिव रविंद्र बाबर यांनी सर्व भाविकांचे आभार मानले . –

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button