वाई:-दातृत्वाचा सन्मान! वाढदिवसाचा अनोखा उपक्रम; संजय मालुसरे यांच्याकडून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स ड्रेसचे वाटप.
पत्रकार अमोल चोरगे महाबळेश्वर तालुका उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई:-दातृत्वाचा सन्मान! वाढदिवसाचा अनोखा उपक्रम; संजय मालुसरे यांच्याकडून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स ड्रेसचे वाटप.

गोडवली, ता. वाई, दि. ३० सप्टेंबर २०२६ :
गोडवली गावचे रहिवासी, युवा उद्योजक तसेच स्पोर्टिका फिटनेस, वाईचे मालक आणि शाळेचे माजी विद्यार्थी श्री. संजय चंद्रकांत मालुसरे यांनी आपल्या मुलगा कु. दक्षिल संजय मालुसरे याच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स ड्रेसचे वाटप केले.
वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्यामध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी, या दृष्टीने करण्यात आलेल्या या उपक्रमाचे शाळेच्या वतीने तसेच ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले.
या प्रसंगी गोडवली गावचे सरपंच मा. विष्णू आप्पा मालुसरे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. विद्या मालुसरे, सौ. अनिता बिरामणे, शाळेतील शिक्षकवृंद तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
श्री. संजय मालुसरे आणि त्यांच्या सौभाग्यवती यांनी केलेल्या या दातृत्वपूर्ण उपक्रमाबद्दल शाळा, सर्व विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती आणि गोडवली ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरतात. वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना दिलेली ही अनोखी भेट म्हणजे दातृत्व, सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचा सुंदर संगम असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.




