कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुंबई:-दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महावितरण ‘हायअलर्टवर’ अभियंते, यंत्रचालक व तारमार्ग कर्मचाऱ्यांना मुख्यालय न सोडण्याचे आदेश; हलगर्जीपणा केल्यास शिस्तभंगाची कारवाई.

पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

मुंबई:-दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महावितरण ‘हायअलर्टवर’ अभियंते, यंत्रचालक व तारमार्ग कर्मचाऱ्यांना मुख्यालय न सोडण्याचे आदेश; हलगर्जीपणा केल्यास शिस्तभंगाची कारवाई.

मुंबई, दि. २ ऑक्टोबर :- राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर महावितरणने आपल्या तांत्रिक यंत्रणेला ‘हायअलर्ट’ दिला आहे. दुष्काळी परिस्थितीत शासनाच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अभियंते, यंत्रचालक आणि तारमार्ग कर्मचाऱ्यांना आपापले मुख्यालय न सोडण्याचे सक्त आदेश देण्यात आले आहेत. महावितरणचे संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांनी याबाबत परिपत्रक जारी केले आहे.
यंदा जूनपासून राज्यातील अनेक भागांत पर्जन्यमानात तूट नोंदविण्यात आली असून, काही भागांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम शेती पिकांवरही झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने विविध उपाययोजना जाहीर केल्या असून, त्यानुसार महावितरणनेही राज्यभरातील तांत्रिक यंत्रणा सतर्क केली आहे.
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या आदेशानुसार संचालक धनंजय औंढेकर (संचालन), योगेश गडकरी (वाणिज्य), सचिन तालेवार (प्रकल्प), राजेंद्र पवार (मानव संसाधन) यांच्यासह सर्व कार्यकारी संचालकांनी विविध परिमंडलांना तातडीने भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. कृषिपंपांसह सर्व वर्गवारीतील ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा मिळावा, यासाठी आवश्यक तांत्रिक कामे, वीजयंत्रणेची पाहणी आणि आवश्यक उपाययोजनांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले.
दुष्काळी परिस्थितीत शेतीसह सर्वच ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा मिळणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे क्षेत्रीय कार्यालयांतील अभियंते, यंत्रचालक आणि तारमार्ग कर्मचाऱ्यांनी आपापल्या मुख्यालयी उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही, असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, काही कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास पर्यायी व्यवस्था करून अथवा तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेऊन वीजपुरवठा पूर्ववत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या कामात हलगर्जीपणा किंवा हयगय करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही महावितरणने दिला आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button