आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अपशिंगे:-(सातारा)-सेनेच्या महार रेजिमेंटच्या शौर्य पर्वात मानसीच्या कर्तुत्वाचा गौरव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड विशेष सत्कार.

पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

अपशिंगे:-(सातारा)-सेनेच्या महार रेजिमेंटच्या शौर्य पर्वात मानसीच्या कर्तुत्वाचा गौरव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड विशेष सत्कार.

अपशिंगे (मिलिटरी) : सातारा जिल्ह्यातील शौर्यभूमी म्हणून नावाजलेले अपशिंगे (मिलिटरी) गाव येथे समता माजी सैनिक सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक विकास संस्था यांच्या वतीने भारतीय सेनेच्या महार रेजिमेंटच्या ८६ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात भारतीय सेनेचे महार रेजिमेंटचे ब्रिगेडियर माननीय श्री. मोहनराव आर. निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच महार रेजिमेंटच्या आजी-माजी सैनिक संघटनांच्या वतीने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपल्या नावाची नोंद करणाऱ्या कु. मानसी महेश मोहिते हिचा विशेष सत्कार करण्यात आला.
हैद्राबाद येथे २६ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या भव्य कराटे प्रदर्शनात सहभागी होत मानसीने जागतिक विक्रमात आपल्या नावाची नोंद केली. तिच्या या उल्लेखनीय आणि अभिमानास्पद कामगिरीची दखल घेत महार रेजिमेंटच्या वतीने तिचा गौरव करण्यात आला.
यावेळी ब्रिगेडियर श्री. मोहनराव आर. निकम यांनी मानसीच्या कर्तृत्वाचे कौतुक करून तिच्या मेहनत, जिद्द, शिस्त आणि सातत्याचे विशेष अभिनंदन केले. महार रेजिमेंटच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात भारतीय सेनेतील मान्यवरांच्या हस्ते झालेला हा सन्मान मानसीसाठी अत्यंत अभिमानाचा आणि प्रेरणादायी क्षण ठरला.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button