कोयना नगर:-सातारा पालकमंत्र्यांच्या पाटणमध्ये रस्त्याची युद्धपातळीवर दुरुस्ती मोहीम…
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
सातारा पालकमंत्र्यांच्या पाटणमध्ये रस्त्याची युद्धपातळीवर दुरुस्ती मोहीम…
कोयना नगर दि: नैसर्गिक वरदान लाभलेल्या सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यामधील अवकाळी पावसाने खूप मोठे नुकसान झालेले आहे. अनेक ठिकाणी पूर परिस्थिती झाली असली तरी महाराष्ट्राचे पर्यटन व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या सूचनेप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने पाटण तालुक्यातील रस्त्याची देखभाल दुरुस्ती सुरू केली आहे.
विशेष म्हणजे अतिवृष्टीमुळे सर्वाधिक फटका सातारा जिल्ह्याला बसला आहे. खासदार व आमदार निधी तसेच डोंगरी विकास, दलित वस्ती सुधार योजना, वित्त आयोग, जिल्हा नियोजन मंडळ आणि विविध योजनेतून आलेल्या निधीतून रस्त्याचे काम केले जाते. आता अतिवृष्टी व अवकाळी पावसाने पुन्हा एकदा चाळण झालेल्या रस्त्याची देखभाल दुरुस्ती करणे गरजेचे बनले आहे. त्यामध्ये पाटण तालुका आघाडीवर राहिला आहे.
सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भाग असलेल्या माण ,खटाव, फलटण आणि कोरेगाव सारख्या ठिकाणी विक्रमी अवकाळी पाऊस पडला आहे. त्याचबरोबर पावसाळ्यातही विक्रमी पाऊस कोसळणाऱ्या महाबळेश्वर, जावळी, पाटण, वाई, सातारा, कराड तालुक्यातही अवकाळी पावसाने चांगलीच चुणूक दाखवले आहे.
सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार देसाई यांनी घार फिरे आकाशी… पण तिचे चित्त पिल्लापाशी.. हे पुन्हा एकदा पाटणकरांना दाखवून दिले आहे. मंत्री महोदय नामदार देसाई यांनी खऱ्या अर्थाने लोहपुरुष बाळासाहेब देसाई यांच्या नंतर पाटण तालुक्याला भरभरून देण्याचा सपाटा लावलेला आहे. शिवसेनेचे दोन नंबरच्या फळीतील नेते म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंतर पाहिले जाते. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक शब्दाला जिल्हा प्रशासन सुद्धा धावून जात आहे.
त्यांच्याच पाटण विधानसभा मतदारसंघांमध्ये सार्वजनिक बांधकाम उपविभाग (दक्षिण) येत आहे. पावसाळ्यापूर्वी सा.बा.विभागाकडील रस्त्याची तातडीने नाले साफ करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेत आहेत. नदीकाठचे गाळ , डोंगर माथ्यावरील दरडीमुळे पडलेला मलबा बाहेर काढला जात आहे.
पाटण तालुक्यामध्ये घाटमाथा व वळण रस्त्यावर वारंवार दरड कोसळत आहेत . अशा ठिकाणी धोक्याची सूचना म्हणून “दरडप्रवण क्षेत्र” अशा आशयाचे चेतावणी फलक रस्त्याच्या अवतीभवती लावण्यात आले आहेत.
रस्त्याच्या बाजुपट्ट्यांची साफसफाई करणेत आली आहे . त्यामुळे पाण्याचा प्रवाह पुढे जाण्यास मदत झाली आहे.पाटण तालुक्यातील काही गावांमध्ये राज्यमार्ग व जिल्हा मार्गावरील तसेच तालुका पातळीवर रस्त्यावरील कोसळलेल्या दरडी हटवून रस्ते खुले केले आहेत. रस्ता वाहतुकीस चालू करणेत आला.
पाटण तालुक्यातील रस्त्यावर कुठेही पावसाचे पाणी साचून राहणार नाही. ह्याकरिता रस्त्याच्या बाजुपट्यांवरून आडू (Notch) काढून साचलेले पाणी गटारी व जवळच्या नाल्या मध्ये वळवले आहेत.पाण्याचा योग्य निचरा होणेसाठी रस्त्यावरील पाईप मोऱ्या व पुल यांची साफसफाई करणेत आली .
खबरदारी म्हणून रस्त्यावरील धोकादायक व अडचण ठरणाऱ्या काही झाडांच्या फांद्या छाटून घेण्यात आल्या. रस्त्यांवरील खड्डे खडी (GSB) ने भरणेचे काम प्रगतीपथावर आहे. सदरची कार्यवाही पूर्ण पावसाळा कालावधीत चालू असणार आहे . पावसाळ्यानंतर खड्डे डांबरमिश्रित खडीने भरण्यात येणार आहेत. तसेच आपत्ती व्यवस्थापन समितीच्या मार्फत पाटण तालुक्यामध्ये तातडीने मदत मिळवण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. सध्या रस्त्याच्या देखभाल व दुरुस्तीसाठी पाटण विभागातील रस्त्यांवर १ जे.सी.बी ,१ डम्पर,१० आणि रस्त्याचे काम करणारे मजूर दिवस-रात्र परिश्रम घेत आहेत.
विशेषतः दरडप्रवण क्षेत्रात १ अतिरिक्त जे.सी.बी. ची तैनाती करणेत आली आहे. असे सार्वजनिक बांधकाम विभागाने पाटण तालुक्यातील रस्त्याच्या दुरुस्ती बाबत माहिती दिली आहे.
सातारा जिल्ह्यातील इतर तालुक्यांबाबत अशी अद्यावत माहिती उपलब्ध न झाल्यामुळे चार मंत्री असलेल्या सातारा जिल्ह्यात फक्त पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पाटणमध्ये युद्ध पातळीवर काम सुरू असल्याची चर्चा सुरू झालेली आहे.
RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन
___________________________
छाया– पाटण तालुक्यामध्ये रस्त्याच्या दुरुस्तीचे सुरू असलेले काम (छाया- अजित जगताप, पाटण)