कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

फलटण:-फलटण तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस, पिकांचं नुकसान.

पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

फलटण तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस, पिकांचं नुकसान.

सातारा प्रतिनिधी विनोद पाटील

फलटण:- फलटण तालुक्यात गिरवी, धुमाळवाडी, बोडकेवाडी, जाधववाडा,निरगुडी,जावली,जिंती,आंदरुड परिसरातील भागात गुढीपाडव्याच्या दिवशी व नंतर दोन दिवस वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस अचानक झाला.शेतातील गहू, हरभरा,मका,,मेथी, कोथिंबीर, टोमॅटो,द्राक्षे, डाळिंब,आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला पिकांचे व फळबांगाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.शेतकरी अचानक आलेल्या वादळीवाऱ्यासह गारांच्या पावसामुळे गोंधळून गेले.शेत शिवारात शेतकरी शेतमजूर यांची एकच ऐन गुढीपाडव्याच्या सणादिवशी धावपळ उडाली.तळवट घेऊन शेतात जाऊन शेतातील काढलेल्या गहूं हरभरा मका पिकांच्या साठवणूकीसाठी शेत शिवारातील शेतकरी शेतमजूर धावपळीत होते.सुगीच्या दिवसांत आलेल्या वादळीवाऱ्यासह गारांच्या पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे.यावर्षी दिवाळीच्या अगोदर अतिवृष्टीमुळे नुकसान झाले तर दिवाळी नंतर हातातोंडाशी आलेला घास वादळीवाऱ्यासह गारांच्या पावसामुळे हातातून निसटून गेला.अनेक शेतकऱ्यांना वादळीवाऱ्यासह गारांच्या पावसामुळे फटका बसला आहे.शासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मधून होत आहे.
तातडीने पंचनामे केले तरच नुकसान भरपाई मिळेल यासाठी प्राधान्याने लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button