सातारा पोलिसांच्या कर्तव्यदक्ष आठवणींना मिळाला उजाळा..
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) सातारा पोलिसांच्या कर्तव्यदक्ष आठवणींना मिळाला उजाळा..

सातारा प्रतिनिधी अजित जगताप
सातारा दि:समाजामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही समाजावर असते. त्याचबरोबर पोलीस यंत्रणा सुद्धा तितकेच महत्त्वाचे असते. सातारा जिल्ह्यामध्ये पोलीस दलात अनेक कर्तव्यदक्ष अधिकारी होऊन गेले. त्यांच्या कर्तबदारीने खऱ्या अर्थाने लोकशाही सुदृढ झाली होती. आता मात्र पोलिस यंत्रणाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभी करण्यात येत आहे. अशा कालावधीमध्ये प्रामाणिक व कर्तव्यदक्ष सातारा जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या आठवणींना चांगला उजाळा मिळत आहे. सातारा जिल्ह्याचा विचार केला तर खऱ्या अर्थाने आय.पी.एस. अधिकारी अशोक कामठे, मीरा बोरवणकर, एम एम मलिकार्जुन प्रसन्ना, संदीप पाटील, अभिनव देशमुख, सुरेश खोपडे, समीर शेख, चंद्रकांत कुंभार, प्रकाश पवार, तेजस्वी सातपुते अशा अनेक अधिकाऱ्यांची व पोलीस अधिकाऱ्यांची नावे घेतली जातात. सध्या राजकीय पटलावर मोठ्या प्रमाणात पोलीस दलाचा हस्तक्षेप होत असल्याने पोलीस दलाची विश्वासार्हता कमी झालेली आहे.
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीच्या वेळी झालेला प्रकार हा कोणत्या लोकशाहीमध्ये बसतो? अशी आता भाजप राज्यकर्त्यांना विचारणा होऊ लागलेली आहे. मंत्री महोदयांच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्याला दमदाटी आणि खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार घडल्यामुळे शरमेने खाली मान घालावी वाटत आहे. सातारा जिल्ह्यामध्ये मनोज पाटील, विश्वास पांढरे, बी. आर .पाटील, नानासाहेब पन्हाळकर, रामदास शिंदे, राजेंद्र मोकाशी, मालोजीराव देशमुख, किशोर धुमाळ व अनेक कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी होऊन गेले. त्यांनी कधीही अन्याय अत्याचार केला नाही किंवा राजकीय पक्षाचे मांडलिकत्व पत्करले नाही. पण, अलीकडच्या काळामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांपेक्षाही काकणभर सरस अशी कामगिरी काही पोलीस अधिकारी वर्ग सामुदायिकरित्या भाजप सत्ताधाऱ्यांसाठी करत आहे. त्याचा फटका महायुतीतील दोन मंत्र्यांना सुद्धा बसला आहे. याबाबत अद्यापही कुणीही आपली बाजू मांडणारा खुलासा केला नाही.
आज भाजपची निर्विवाद सत्ता असल्यामुळे प्रत्येक पोलीस ठाण्याच्या कारभारी याबाबत तोंडी व लेखी तक्रार आहे. सत्ताधाऱ्यांना मदत करत असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नाही. आता हा प्रश्न विधिमंडळाच्या अधिवेशनात उपस्थित केला गेला आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्याची अब्रू चव्हाट्यावर मांडली गेली आहे. राजकीय महत्त्वकांक्षीमुळे सर्व लोकशाहीची तत्व गुडाळण्यात आलेले आहेत. याला मोठ्या अक्काचा आशीर्वाद असल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीमध्ये सातारा जिल्ह्यातील पोलीस दलाने यापूर्वी केलेल्या कामगिरीची अनेकांना आठवण होत आहे. उदाहरण द्यायचे झाले तर राज्याचे मुख्यमंत्रीपद जेव्हा सातारा जिल्ह्यात होते त्यावेळेला पोलीस अधीक्षक यांच्याकडे मुख्यमंत्र्यांच्या नजीक असलेल्या कार्यकर्त्याच्या पोलीस अधिकारी जावयाला चांगली पोस्टिंग मिळावी. असा कार्यकर्त्याने आग्रह केला. तसा पोलीस अधीक्षक यांना निरोप सुद्धा गेला परंतु त्यांनी त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही. कराड येथील एका कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री व पोलीस अधीक्षक एकत्र आल्यानंतर त्या कार्यकर्त्यांनी आठवण करून दिली. त्यावेळेला कडक सलाम करून एस. पी. एम एम प्रसन्ना यांनी ठणकावून सांगितले, अगला एस.पी. आयेगा .. वो पहिला यही काम करेगा.. असे सांगून ते निघून गेले. आता असाच कडक सलाम व धमक असणारा एस. पी. राहिले नाही. अशी खंत वाटत आहे. सध्या सामान्य माणसांवर अन्याय होत असल्याने पोलीस ठाण्याच्या कारभाऱ्याबाबत तक्रार होऊन सुद्धा त्याला पाठीशी घातले जात आहे. बेकायदेशीर धंद्याचे हप्ते वाढले वाढवले जात आहे.
तात्कालीन सातारा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी राजकीय पटलावर चमकणाऱ्या गुंडांचे फ्लेक्स लावून जनतेला सावध केले होते. आता भ्रष्ट पोलिस अधिकाऱ्याचे पुरवण्या निघत आहेत. त्यांना सिंघम बनवले जात आहे .अशी आता महायुती तील निष्ठावंत कार्यकर्त्यांनी सुद्धा खंत व्यक्त केली आहे. दिसतं तसे नसते म्हणून जग फसते. भाजप पक्ष हा नीतिमत्ता व विचारांवर चालणारा पक्ष आहे. या सर्व गोंधळामध्ये कुठेही निष्ठावंत भाजप कार्यकर्ता नाही. त्याचा आम्हाला समाधान आहे. असे काहींनी सांगितले. दरम्यान, सातारा पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेबद्दल सामान्य माणसांना आशा आहे. ज्यांनी कर्तव्यदक्षतेने प्रामाणिक काम केले आहे. करत आहेत .त्यांना आजही कायदा व सुव्यवस्था राखणारी सातारकर सन्मानाने आठवण काढून सलाम करत आहे. हे यातून स्पष्ट झाले. पोलिसांबद्दल समाजामध्ये आदर युक्त दहशत असणे गरजेचे आहे. कमी होत असेल तर त्याचा पोलीस दलाने विचार करावा अशी मागणी पुढे आलेली आहे.
2) म्हसवड नगरीमध्ये विनापरवाना बंधारा पडल्या बाबतची तक्रार, अद्याप चौकशी नाही….

म्हसवड दि: लाखो भाविकांच्या नवसाला पावणाऱ्या श्री सिद्धनाथ च्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दुष्काळी माण तालुक्यातील म्हसवड या ठिकाणी विनापरवाना म्हसवड हद्दीत माण गंगा नदीत यात्रा पटांगण शेजारी असलेला माणदेशी फाऊंडेशन बंधारा पाडण्यात आला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते आजिनाथ केवटे यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केलेली आहे. अद्यापही याप्रकरणी कुणालाही दोषी न धरता पोलीस यंत्रणा कर्तव्यदक्षतेने काम करत असल्याचे माहिती मिळाली आहे.
म्हसवड नगरीमध्ये मानगंगा नदीच्या किनारी वार्षिक यात्रा भरते. तसेच या ठिकाणी बंधारा बांधण्यात आलेला आहे. या बंधाऱ्यासाठी पाटबंधारे विभाग व शासनाने निधी उपलब्ध केला. परंतु आता ब्रेकरच्या साहयाने शासनाच्या जागेतील बंधारा पाडत असतानाही पाटबंधारे विभाग, महसूल विभाग, पोलीस यंत्रणा हात बांधून बसलेले आहे. याबाबत योग्य ती कारवाई करावी. तक्रार मागे घेण्याची वाट पाहू नका. असा गर्भित इशारा सामाजिक कार्यकर्ते अजिनाथ केवटे यांनी संबंधितांना दिलेला आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, म्हसवड मधील माणगंगा नदी पात्रात
माणदेशी फाऊंडेशन बंधारा शासनाच्या जागेत बांधण्यात आलेला आहे. दिनांक २१ मार्च रोजी सकाळी अकरा वाजता सदरचा बंधारा ब्रेकरच्या साह्याने उध्वस्त करण्यासाठी सहा कामगार झटत असल्याची माहिती श्री केवटे यांना मिळाली. त्यांनी याबाबत लोकशाही मार्गाने सदरच्या कामगारांना कोणाच्या आदेशावरून आणि हा बंधारा का पाडण्यात येत आहे? अशी शांतपणाने विचारणा केली असता त्या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या सहा कामगारांपैकी एका कामगाराने सांगितले की, म्हसवड येथील पुरोगामी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते विजय दत्तात्रय गुरव (विजय सिन्हा) यांनी ब्रेकरच्या साह्याने हा बंधारा पाडण्यास लावले आहे. सदर घटनास्थळी मीनी टॅक्टर व बांधकाम पाडण्याची आधुनिक यंत्रणा त्यावर ब्रेकरची मशिन बसवून व त्याला जोडलेले २ ब्रेकर होते.
महाराष्ट्र शासनाची शासनाची परवानगी नसताना हे काम बेकायदेशीर रित्याच
चालू होते. त्याच वेळेस विजय सिन्हा बंधारा नजीक आले आणि त्यांनी श्री केवटे यांना तुला काय कारायचे आहे ते कर, मला
माणच्या मंत्र्यांचा सपोट आहे. कोणी माझे काही करू शकत नाही. त्यामुळे मी तेथून शाब्दिक वाद न घालता निघून आलो. तरी शासनाच्या जागेतील बांधलेला बंधारा तोडत असलेले बेकायदेशीर काम बंद करून ब्रेकर मिशन ट्रक्टर तसेच ज्याने हे काम करायला लावले यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. असे निवेदनात श्री अजिनाथ केवटे यांनी नमूद केले आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या नाट्य मध्ये पोलिसांनी तत्परतेने अपहरणाचा गुन्हा दाखल करून आरोपींना ताब्यात घेतले होते. हा सर्व प्रकार भाजपच्या सांगण्यावरून झाल्याची जाहीर चर्चा होत आहे. ही चर्चा ताजे असतानाच म्हसवड नगरीमध्ये भाजपच्या मंत्र्यांचे नाव सांगून बंधारा पाडून लाखो रुपयांचे नुकसान केले जात आहे. एवढेच नव्हे तर तक्रारदाराला दमदाटी केली जात आहे. तसेच त्याने तक्रार मागे घ्यावी यासाठी त्याच्यामागे तगादा लावला जात आहे. तक्रारदार जर ऐकला नाही तर त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात खोटा गुन्हा दाखल करून त्याला अटक होण्याची भीती त्याच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे. विकास कामे करण्यापेक्षा राजकारणासारखी तोडफोड व तोडातोडी मान तालुक्यात होत आहे. असे अजिनाथ केवटे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
दरम्यान, दुष्काळी भाग असलेल्या माण तालुक्यामध्ये दुष्काळ हटवण्यासाठी अनेक बंधारे बांधण्यात आलेले आहेत. त्यामुळे ठेकेदारांचे उकळ पांढरे झाले असले तरी आजही मोठ्या प्रमाणात उन्हाळ्यामध्ये टँकर पुरवठा करण्याची मागणी होत आहे. स्वतःला जलनायक समजणाऱ्यांनी कधीतरी सत्य समजून घ्यावे व जनतेची तहान भागवावी. अशी सामाजिक कार्यकर्ते श्री केवटे यांनी विनंती केली आहे. एकतर शासनाचा निधी विकास कामासाठी लवकर मिळत नाही. विकास कामे करताना टक्केवारी द्यावी लागते. आणि त्यानंतर निधी मंजूर होतो आणि मंजूर झालेला विकास कामे विनापरवाना तोडणे हा राष्ट्रद्रोह आहे. शासनाची रीतसर परवानगी घेऊन त्यांनी बंधारास नव्हे तर संपूर्ण माण तालुक्यात निकृष्ट दर्जाची झालेली विकास कामे पाडावीत. नव्याने निधी आणून ठेकेदारांचे कल्याण करावे. असाही उपरोधात्मक सल्ला दिला आहे. दरम्यान, याबाबत सार्वत्रिक सुट्टी असल्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांची बाजू समजू शकली नाही._______________________




