महाबळेश्वर:-पाचगणी येथे मुलींसाठी निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन.
पत्रकार अनिल वाडकर सातारा जिल्हा संघटक

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

पाचगणी येथे मुलींसाठी निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन.

सातारा प्रतिनिधी अनिल वाडकर
पाचगणी येथील ग्रामपरी, MRA सेंटर येथे मुलींसाठी निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. Initiatives of Change India आणि ग्रामपरी यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेले हे शिबिर मुलींच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी तसेच नैतिक मूल्यांची जडणघडण करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
हे प्रशिक्षण शिबिर २५ मार्च ते १० एप्रिल २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आले असून १६ ते २५ वयोगटातील मुलींसाठी ही संधी उपलब्ध आहे. शिबिरामध्ये विविध कौशल्ये आणि आधुनिक ज्ञान देण्यावर भर देण्यात येणार आहे.
प्रशिक्षणाची प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत :
शिवणकामाचे प्रशिक्षण आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) विषयी माहिती
इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्वास वाढविणे
सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शन व्यक्तिमत्त्व विकास आणि नैतिक मूल्यांची जडणघडण कौशल्य विकास कार्यशाळा या शिबिरासाठी प्रवेश शुल्क फक्त १००० रुपये ठेवण्यात आले असू राहण्याची आणि जेवणाची सर्व सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी आयोजकांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




