सुपा:-रांजणगाव येथील श्री साई दिंडीचे शिर्डीकडे प्रस्थान!
पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

रांजणगाव येथील श्री साई दिंडीचे शिर्डीकडे प्रस्थान!
(: राजकुमार इकडे)
दि,२२ सुपा; (अहिल्यानगर)
पारनेर तालुक्यातील ,सुपा पंचक्रोशीतील रांजणगाव मशिद येथील श्री साई बाबा देवस्थान च्या वतीने गेली १७ वर्षा पासुन श्री साई बाबा पालखी दिंडी ही पायी दिंडी शिर्डीकडे प्रस्थान करीत असते .
सालाबाद प्रमाणे आज दि,२२ रोजी सकाळी ८ वाजता साई बाबांची महाआरती होउन टाळ ,मृदुंगाच्या गजरात दिंडी ही अहिल्यानगरच्या दिशेने शिर्डीकडे रवाना झाली, कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील सर्व साई भक्त ,महिला मोठ्या संखेने उपस्थित होता.
पायी दिंडी सोहळ्याचे नियोजन श्री साई बाबा मंडळाचे प्रमुख बाळासाहेब सोनवने,सुरेश गारकर(मेजर),बाळासाहेब गाढवे,बनकर मेजर,संतोष जवक,अक्षय जवक,मारुती गाढवे, ज्ञानेश्वर जवक (साईभक्त शिर्डी) यांनी केले,
कार्यक्रमासाठी रांजणगावचे आदरास्थान श्री राहुल शिंदे(पाटील),गावचे सरपंच महेश देशमुख, बंटी साबळे(मा,सरपंच),शरद सरोदे(मा,सरपंच), प्रा, चंद्रकात शिंदे ,राधाकृष्ण देशमुख, ह,भ,प, संपतराव जवक, भाउसाहेब येणारे अदी ग्रामस्त,महिला मोठ्या संखेने उपस्थित होते.




