कराड:-कालगावची ऐतिहासिक यात्रा 2026 – भक्ती, परंपरा आणि जल्लोषाचा महासंगम!
पत्रकार सुशील कुमार पुजारी कराड तालुका उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

कराड:-कालगावची ऐतिहासिक यात्रा 2026 – भक्ती, परंपरा आणि जल्लोषाचा महासंगम!

तालुका प्रतिनिधी सुशील कुमार पुजारी
कालगाव येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही वार्षिक यात्रेचा उत्साह शिगेला पोहोचला असून, संपूर्ण गाव भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाले आहे. दि. 22 मार्च 2026 रोजी हरजागराने यात्रेला सुरुवात होणार असून, दि. 23 मार्च 2026 रोजी पहाटे 5 वाजता कृष्णा नदीपासून कालभैरव मंदिरापर्यंत भव्य दंडस्थान व देवाचा अभिषेक पार पडणार आहे. त्याच दिवशी रात्री 11:30 वाजता छबिना सोहळा आणि पहाटे 5 वाजेपर्यंत पालखी व काठीची मिरवणूक होणार आहे.
गावात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून, खेळणी, मिठाई आणि आईस्क्रीमच्या गाड्यांनी यात्रेची शोभा अधिकच वाढली आहे.
🏐 क्रीडा स्पर्धांचा जल्लोष
दि. 21 मार्च 2026 रोजी “कालभैरव हॉलीबॉल चषक 2026” अंतर्गत भव्य राज्यस्तरीय ढकली हॉलीबॉल स्पर्धा पार पडणार आहे. विविध मान्यवरांच्या हस्ते आकर्षक बक्षिसांचे वितरण करण्यात येणार आहे. या स्पर्धेचे आयोजन श्री. राजेंद्र रमेश चव्हाण यांनी केले आहे.
🐂 कालभैरव केसरी 2026 – बैलगाडा शर्यतीचा थरार
दि. 23 मार्च 2026 रोजी भव्य बैलगाडा स्पर्धा “कालभैरव केसरी 2026” आयोजित करण्यात आली आहे.
🥇 प्रथम क्रमांक: ₹51,000 + ढाल
🥈 द्वितीय क्रमांक: ₹31,000 + ढाल
🥉 तृतीय क्रमांक: ₹21,000 + ढाल
तसेच इतर क्रमांकांसाठीही आकर्षक बक्षिसे
ही स्पर्धा अखिल भारतीय बैलगाडा संघटना, महाराष्ट्र राज्य व शासकीय नियमांनुसार पार पडणार आहे. आयोजन लोकनियुक्त सरपंच सोमनाथ भाऊ चव्हाण व ग्रामस्थांच्या सहकार्याने होत आहे.
🎭 मनोरंजनाची मेजवानी
📅 24 मार्च 2026: स्वर सम्राज्ञी माया मलकापूरकर यांचे लोकनाट्य तमाशा (रात्री 9 ते 1)
📅 25 मार्च 2026: ऑर्केस्ट्रा “धडाका कोल्हापूर” (रात्री 10 ते पहाटे 2)
✨ यात्रा कमिटी व समस्त ग्रामस्थ कालगाव यांच्या वतीने सर्व भाविक भक्तांचे मनःपूर्वक स्वागत!




