कराड:-ओगलेवाडी येथील औद्योगिक वसाहतीमध्ये श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांचा नागरी सत्कार
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
ओगलेवाडी येथील औद्योगिक वसाहतीमध्ये श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांचा नागरी सत्कार.
ओगलेवाडी येथील औद्योगिक वसाहतीमध्ये श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी व्यासपीठावरती श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांना मानाचा मुजरा करून त्यांच्या विजयमुद्राची खात्री पटवून दिली. औद्योगिक वसाहतीमधील उद्योजक सचिन कलबुर्गे, साजिद पटेल, शिंदे मामा, श्रीकांत गुलबर्गे, अमोल कलबर्गे व ओगलेवाडी परिसरातील शेकडो महिला व पुरुष कामगार मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमाला सहभागी झाले होते. युवा नेते रामकृष्ण वेताळ यांनी प्रास्ताविक केले .खटाव, पाटण परिसरातील कर्मचारी वर्ग उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. केंद्रीय विविध योजना राबवण्यासाठी विशेष परिश्रम घेतले जातील. सातारा जिल्ह्यातील सर्व औद्योगिक वसाहत उत्तमरीत्या चालावी .त्यांना विविध शासकीय योजनेचा लाभ मिळावा. यासाठी श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले हे निश्चितच पाठपुरावा करतील अशी उद्योजकांनी ग्वाही दिली. यावेळी सागर शिवदास, चंद्रकांत मदने मनोज दादा घोरपडे यांनीही मनोगत व्यक्त केले. छत्रपती उदयनराजे भोसले यांचा विजय असो अशी घोषणा कामगारांनी दिली.