पुणे -तळेगाव दाभाडे येथे संतापजनक प्रकार : ट्रिपल सीटवरून विद्यार्थ्याला पोलिसांकडून बेदम मारहाण?
पत्रकार अशोक आर्ते मावळ तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

पुणे -तळेगाव दाभाडे येथे संतापजनक प्रकार : ट्रिपल सीटवरून विद्यार्थ्याला पोलिसांकडून बेदम मारहाण?

तालुका प्रतिनिधी अशोक आर्ते
तळेगाव दाभाडे : कायद्याचे पालन करवणाऱ्या पोलिसांकडूनच कायद्याचा भंग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तळेगाव दाभाडे येथे भर रस्त्यात लॉ कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या तुषार दळवी या विद्यार्थ्याला पोलिसांकडून बेदम मारहाण केल्याचा आरोप होत असून, या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तुषार दळवी हा आपल्या मित्रांसोबत ट्रिपल सीट मोटारसायकलवरून प्रवास करत होता. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे पोलिसांनी त्यांना अडवले. यावेळी विद्यार्थ्याने आपली चूक मान्य करत, “दंड असेल तर भरायला तयार आहे,” अशी विनंती केली होती. मात्र, पोलिसांनी त्याचे म्हणणे न ऐकता त्याच्याशी शिवीगाळ करत भर रस्त्यात मारहाण केल्याचा आरोप आहे.

या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आल्याने परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांकडून पोलिसांच्या वर्तणुकीवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असून, संबंधित पोलिसांवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. आता पोलीस आयुक्त या घटनेवर नेमकी कोणती कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक असले, तरी कायद्याचे रक्षण करणाऱ्या यंत्रणेकडून संयम आणि जबाबदारीची अपेक्षा व्यक्त केली




