अहिल्यानगर:-कायद्यापुढे कोणीही मोठा नाही! मनसेच्या ठिय्या आंदोलनाला यश; तहसीलदारांच्या गाडीवरील नियमबाह्य लाल अंबर दिवा अखेर उतरवला.
पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) अहिल्यानगर:-कायद्यापुढे कोणीही मोठा नाही! मनसेच्या ठिय्या आंदोलनाला यश; तहसीलदारांच्या गाडीवरील नियमबाह्य लाल अंबर दिवा अखेर उतरवला.

मनसेच्या आक्रमक पाठपुराव्याला यश; आरटीओच्या पथकाची कारवाई, अनधिकृत लाल दिवा काढला.
प्रतिनिधी (राजकुमार इकडे) :
अहिल्यानगर : शासकीय नियमांचे उल्लंघन करून पारनेर तहसीलदार यांच्या शासकीय वाहनावर लावण्यात आलेल्या कथित नियमबाह्य लाल अंबर दिव्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना, पारनेर तालुक्याच्या वतीने करण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर संबंधित यंत्रणेने कारवाई करत तहसीलदारांच्या शासकीय वाहनावरील अनधिकृत लाल अंबर दिवा काढून टाकला.
मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांच्या शासकीय वाहनावर लाल अंबर दिवा वापरला जात असल्याचा मुद्दा उपस्थित करत संबंधित प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली होती. या मागणीसाठी मनसेच्या वतीने ठिय्या आंदोलन तसेच सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. अखेर या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेतली.
जिल्हा प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांच्या आदेशानुसार मोटार वाहन निरीक्षक अनिल केदार यांच्या पथकाने संबंधित वाहनाची पाहणी करून तहसीलदारांच्या गाडीवरील अनधिकृत लाल अंबर दिवा काढून कारवाई केली.
“कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही” — अविनाश पवार
याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पारनेर तालुका अध्यक्ष अविनाश मुरलीधर पवार म्हणाले, “कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. सामान्य नागरिकांवर कारवाई करणाऱ्या यंत्रणेनेच नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. मनसेने उचललेल्या या मुद्द्यामुळे नियमबाह्य दिवा काढण्यात आला आहे. हा केवळ मनसेचा विजय नसून कायद्याचा आणि जनतेचा विजय आहे. यापुढेही कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याकडून कायद्याचा भंग झाल्यास मनसे अशाच पद्धतीने आवाज उठवेल.”
मनसेच्या या आंदोलनामुळे शासकीय वाहनांवर नियमबाह्य पद्धतीने विशेष दिवे अथवा इतर सुविधा वापरण्याच्या प्रकारांना आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, “कायद्यापुढे कोणीही मोठा नाही” या भूमिकेवर मनसेने ठाम राहत केलेल्या पाठपुराव्याची तालुक्यात चर्चा सुरू असून, मनसेच्या कार्यकर्त्यांकडून या कारवाईचे स्वागत करण्यात आले आहे.
2) पारनेर:-पत्रकारितेतील उत्कृष्ट कार्यासाठी वसंत रांधवण यांना `सत्यशोधक पत्रकारिता’ पुरस्कार.

पत्रकार भवन पुणे येथे पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.
पारनेर, सुपा: राजकुमार ईकडे
दि.२०, पारनेर (अहिल्यानगर): अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पारनेर तालुका उपाध्यक्ष तसेच दैनिक अक्षराज चे अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी वसंत रांधवण यांना पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय व सातत्यपूर्ण योगदानाबद्दल राज्यातील दैनिक अक्षराज मेडिया समूहाकडून दिला जाणारा यंदाचा सन २०२६ सत्यशोधक पत्रकारिता
पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
हा सन्मान दैनिक अक्षराज वृत्तपत्राच्या पाचव्या वर्धापनदिन व स्नेह मेळावा नुकताच पुणे येथील पत्रकार भवन येथे ८९ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनिस, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष भगवानराव वैराट, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम, सुप्रसिद्ध कवी हेमंत मुसरीफ दैनिक अक्षराज चे संपादक विनोद गोरे, सहसंपादीका प्राजक्ता चव्हाण – गोरे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले. याप्रसंगी राज्यातील अक्षराज वृत्तपत्राचे प्रतिनिधी उपस्थितहोते.
समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडत, सामान्य नागरिकांच्या समस्या प्रभावीपणे मांडण्याचे कार्य वसंत रांधवण यांनी पत्रकारीतेतून सातत्याने केले आहे. त्यांच्या निर्भिड लेखनशैलीमुळे व सामाजिक बांधिलकीमुळे पत्रकारिता क्षेत्रात त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. याच कार्याची दखल घेत त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल खासदार निलेश लंके, आमदार काशिनाथ दाते, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब खिलारी वसंत रांधवण यांच्या कार्याचे सर्वस्तरातून मुक्तकंठाने कौतुक करत, त्यांच्या पुढील पत्रकारितेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. समाजाहितासाठी निस्वार्थ कार्य करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान हा प्रेरणादायी ठरतो. वसंत रांधवण यांना आजपर्यंत अनेक नामांकित पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे.





