वाई:-वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांची सदिच्छा भेट; कायदा-सुव्यवस्थेला प्राधान्य देत पोलीस सेवेत नेहमीच प्रयत्नशील.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण - 8208717483

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाई:-वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांची सदिच्छा भेट; कायदा-सुव्यवस्थेला प्राधान्य देत पोलीस सेवेत नेहमीच प्रयत्नशील.

वाई पोलीस ठाण्याची धुरा आता कर्तव्यदक्ष अधिकारी प्रदीप सूर्यवंशी यांच्या हाती; सर्वसामान्यांशी आपुलकी, कायदा-सुव्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य!
सातारा जिल्हा पोलीस दलातील कर्तव्यदक्ष आणि अनुभवी अधिकारी म्हणून ओळखले जाणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी नुकताच वाई पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकार व सामाजिक क्षेत्रातील संभाजी पुरीगोसावी यांनी वाई पोलीस ठाण्यात त्यांची सदिच्छा भेट घेतली.
यावेळी “जयहिंद साहेब, नमस्कार” म्हणत पुरीगोसावी यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांचे स्वागत केले. या सदिच्छा भेटीदरम्यान पोलीस सेवा, कायदा व सुव्यवस्था तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांबाबत विविध विषयांवर चर्चा झाली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी आपल्या प्रदीर्घ पोलीस सेवेत विविध जिल्ह्यांतील पोलीस ठाण्यांमध्ये प्रभारी अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तसेच जिल्हा पोलीस मुख्यालयातील महत्त्वाच्या पदांवरही त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे.
मूळचे सातारा जिल्ह्यातील असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यवंशी हे कायदा आणि सुव्यवस्थेला प्रथम प्राधान्य देणारे अधिकारी म्हणून परिचित आहेत. पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबतच पत्रकार आणि सर्वसामान्य नागरिकांशीही प्रेमळ, आपुलकीचा आणि मनमिळावू स्वभाव ठेवत काम करण्याची त्यांची कार्यपद्धती असल्याचे सांगितले जाते.
यापूर्वीही त्यांनी सातारा जिल्ह्यासह विविध पोलीस ठाण्यांमध्ये प्रभारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि कार्यक्षमतेचा लाभ वाई पोलीस ठाण्याच्या कामकाजाला होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
वाई शहर व परिसरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवणे, नागरिकांच्या समस्या संवेदनशीलतेने समजून घेणे आणि पोलीस प्रशासनाबद्दल नागरिकांचा विश्वास अधिक दृढ करणे, या दृष्टीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या कार्यकाळाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
2) इचलकरंजी:-अभ्यासाच्या तणावामुळे विद्यार्थिनीं हिंदवीने उचलले टोकाचं पाऊल जीवन संपविले!

कोल्हापूर जिल्ह्यातून इचलकरंजी मधून मन हेलावून टाकणारी दुर्दैवी घटना समोर आली आहे. वैद्यकीय एका विद्यार्थिनीने अभ्यासांच्या ताण-तणावातून राहत्या घरी गळफास घेवुन आपले जीवन संपवले आहे. हिंदवी म्हळसाकांत कवडे (वय 23 ) रा. सुंदर नगर चौक) असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थिंनीचे नाव आहे. हिंदवी ही भाजपच्या नगरसेविका शशिकला कवडे यांची मुलगी होती. आत्महत्या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हिंदवी ही बीएएमएस द्वितीय वर्षात शिकत होती. तिचा पेपर असल्यामुळे ती मागील काही दिवसांपासून अभ्यासाच्या तणावाखाली होती. अभ्यास पूर्ण होत नसल्याने तिला मानसिक त्रास होत होता आणि याच तणावांतून तिच्या प्रकृतीवरही परिणाम झाला होता. या दरम्यान तिने राहत्या घरातील अभ्यासांच्या खोलीत ओढणीने गळफास लावून आपले जीवन संपवले आहे. सदरची घटना लक्षात आल्यानंतर कुटुंबियांनी तिला तातडीने इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारांपूर्वींच तिची प्राणज्योत मावळली होती. अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत.





