ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वैजापूर :-शिरसगाव ग्रामस्थांनी केले वैजापूर आगारचे बस चालक वाहक यांचे स्वागत.
प्रतिनिधी:- रामकृष्ण भवर :-7499894897

शिरसगाव ग्रामस्थांनी केले वैजापूर आगार चे बस चालक व वाहक यांचे स्वागत. गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे शिरसगाव ते वैजापूर बस सेवा खंडित करण्यात आली होती आज दिनांक 22.7.2022. बस सेवा पुन्हा नव्याने सुरू करण्यात आली . आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास बस गावात येताच गावातील नागरिकांनी बस चालक व वाहक यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत केले त्यावेळी गावातील पोलीस पाटील महेश भाऊ निंबाळकर व माजी सरपंच विलास भाऊ मलिक. माजी सरपंच पोपट धात्रक व तंटामुक्ती अध्यक्ष अमोल धात्रक रमेश काका मलिक रामेश्वर पाटील झिने व गावातील अन्य नागरिकांनी वैजापूर आगर प्रमुख यांचे आभार व्यक्त केले. महालगाव प्रतिनिधी. रामकृष्ण पाटील भवर