भारती विद्यापीठ:-(पुणे)-चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी गजाआड आंबेगांव पोलीस स्टेशनची उत्कृष्ट कामगिरी, २,४०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त.
पत्रकार अब्दुल रहीम शेख कात्रज शहराध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी गजाआड आंबेगांव पोलीस स्टेशनची उत्कृष्ट कामगिरी, २,४०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त.

दिनांक १३/०५/२०२६ रोजी रात्री ०९/३० वा. सुमारास आंबेगांव रोडने दत्तनगर येथून फिर्यादी त्यांच्या घराचे दिशेने पायी चालत जात असताना त्यांचे समोरुन दत्तनगर चौकाकडुन रस्त्याने एका काळया रंगाची दुचाकी मोटार सायकलवरुन दोन अनोळखी इसमांनी फिर्यादी यांच्या जवळ जावून त्यांच्या गळ्यातील मिनी गंठण जबरदस्तीने हिसकावून चोरी करुन पळून गेले. त्यामुळे फिर्यादी यांनी तक्रार दिल्याने आंबेगांव पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर २०९/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९(४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
दाखल गुन्हयाचे अनुषंगाने आंबेगांव पोलीस स्टेशनडकील तपास पथकाने तब्बल २०० ते २५० सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून आरोपी निष्पन्न केले. त्यानंतर सदरचे आरोपी हे सासवड परिसरात असल्याची गोपनीय माहिती तपास पथकाचे अंमलदार धनाजी धोत्रे, सचिन गाडे, ज्ञानेश्वर चित्ते व प्रमोद भोसले यांना मिळाल्याने मा. वपोनि शरद झिने यांच्या आदेशान्वये आंबेगांव पोलीस ठाणेकडील पोलीस उप-निरीक्षक, युवराज शिंदे व तपास पथकाचे अंमलदार असे सदर ठिकाणी जावून आरोपीचा कसोशीने शोध घेवून त्यांना शिताफीने पकडले. त्यांना त्यांचा नाव पत्ता विचारला असता त्यांनी त्यांची नाचे १) रोहित राजु माने वय-२० वर्षे काम काहीनाही सध्या रा. मु.पो. खंडोबानगर झोपडपट्टी, सासवड पुणे यापुर्वी रा बाबर प्लॉटींगजवळ, दत्तमंदिरमागे, खोपडेनगर, भारतनगर, गुजर निंबाळकरवाडी, कात्रज पुणे २) ओमकार विकास नाईक वय २२ वर्षे रा. लक्ष्मी वजन काट्याजवळ, नवीन सकाळ प्रेसच्या शेजारी, संभाजीनगर, वडकी पुणे अशी असल्याचे सांगितल्याने व त्यांनी गुन्हा केला असल्याबाचत उपयुक्त माहिती दिल्याने ताच्यात घेण्यात आले. त्यानंतर आंबेगांव पोलीस स्टेशन येथे आणून त्यांना दाखल गुन्हयात अटक करण्यात आली असून त्याच्याकडून चोरीच्या ३ दुचाकी व १० ग्रॅम सोने असा एकूण २,४०,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा.श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. संजय दराडे, पोलीस सह आयुक्त पुणे शहर, मा. श्री. राजेश बनसोडे, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग पुणे, मा. श्री. मिलींद मोहिते पोलीस उपआयुक्त परिमंडळ-२ पुणे शहर व मा. श्री. राहुल आवारे सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शरद झिने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) चांगदेव सजगणे, पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे, पोलीस अंमलदार चेतन गोरे, हणमंत मासाळ, हरिश गायकवाड, निलेश जमदाडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, ज्ञानेश्वर चित्ते, प्रमोद भोसले, नितीन कातुर्डे, शिवाजी पाटोळे, फिरोज शेख, अजय कामठे, सुभाष मोरे, योगेश जगदाळे, राकेश टेकवडे अवधूत जमदाडे यांच्या पथकाने केली.
(श्री.शरद झिने) वरिष्ठ पोलीस निरीक्षक आंबेगाव पोलीस स्टेशन पुणे शहर




