क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई एसटी स्टँडवरील मंगळसूत्र चोरीचा अवघ्या काही तासांत उलगडा; महिला आरोपी अटकेत.

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाई एसटी स्टँडवरील मंगळसूत्र चोरीचा अवघ्या काही तासांत उलगडा; महिला आरोपी अटकेत.

 

सातारा | वाई, दि. ११ : वाई एसटी स्टँड परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत चोरी करण्यात आलेले सुमारे २ तोळे वजनाचे व २ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र वाई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने हस्तगत करत एका महिला आरोपीला अटक केली आहे. या कारवाईमुळे पोलिसांच्या तत्परतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ४ जून २०२६ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास श्रीवर्धन ते सातारा या बसने प्रवास करणाऱ्या दिशा नितीन कांबळे या महिलेच्या पर्समधील सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने लंपास केले होते. या प्रकरणी वाई पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक पंकज रणपिसे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक कामाला लागले. तपासादरम्यान पोलिसांनी वाई एसटी स्टँड परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. तसेच गोपनीय माहितीदारांच्या माध्यमातून संशयित महिलेबाबत माहिती मिळवली.
दरम्यान, संबंधित महिला पुन्हा एसटी स्टँड परिसरात येणार असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयित महिलेला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान तिने आपले नाव जयपाल लक्ष्मण पवार (पारधी वस्ती, शिरूर) असे सांगितले. अधिक चौकशीत तिने सदर चोरीची कबुली दिली.
यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेकडून चोरीस गेलेले २ तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त केले. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे २ लाख ५० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर-मंडलिक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सांखुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत पोलीस निरीक्षक पंकज रणपिसे, पोलीस निरीक्षक अनिल गवळी, पोलीस उपनिरीक्षक इंद्रजीत वाघुळे तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने सहभाग घेतला.
या यशस्वी कारवाईबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वाई गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अभिनंदन केले आहे.

2) वाई पोलिसांची दमदार कामगिरी! २७ चोरीचे मोबाईल शोधून मालकांना परत; ५ लाख ४० हजारांचा मुद्देमाल हस्तगत.

सातारा | वाई, दि. ११ : वाढत्या मोबाईल चोरी व हरवलेल्या मोबाईलच्या तक्रारींचा गांभीर्याने पाठपुरावा करत वाई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांतून चोरीस गेलेले आणि हरवलेले तब्बल २७ मोबाईल फोन शोधून काढत सुमारे ५ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत करण्यात आला आहे.
वाई शहर हे सातारा जिल्ह्यातील प्रमुख व्यापारी केंद्र असल्याने येथे दररोज हजारो नागरिक विविध कामांसाठी ये-जा करतात. गर्दीच्या ठिकाणी आणि प्रवासादरम्यान मोबाईल हरवण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने या तक्रारींवर विशेष लक्ष केंद्रित केले होते.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर मेंढम आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण शाखेला विशेष सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज आणि पोलीस अंमलदार विशाल शिंदे यांनी तांत्रिक विश्लेषण, मोबाईल ट्रॅकिंग आणि विविध यंत्रणांच्या मदतीने महाराष्ट्रातील विविध भागांसह इतर राज्यांमधूनही मोबाईलचा माग काढला. सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर हे सर्व मोबाईल हस्तगत करण्यात यश आले.
शोधण्यात आलेल्या २७ मोबाईलची एकूण किंमत सुमारे ५ लाख ४० हजार रुपये असून ते संबंधित तक्रारदारांच्या ताब्यात देण्यात आले. हरवलेला मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी वाई पोलिसांचे आभार मानत समाधान व्यक्त केले.
विशेष म्हणजे, मार्च २०२४ पासून आजपर्यंत वाई गुन्हे प्रकटीकरण शाखेने तब्बल ३५० हरवलेले व चोरीचे मोबाईल शोधून मालकांना परत केले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये पोलिसांबद्दलचा विश्वास अधिक दृढ होत असल्याचे दिसून येत आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी, पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, पोलीस कर्मचारी विशाल शिंदे, हेमंत शिंदे, नितीन कदम, श्रावण राठोड आदींच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button