पारनेर तालुक्यात चारा-पाण्याचा तीव्र तुटवडा – मनसेच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांना दिले निवेदन, तातडीने चारा डेपो-टँकरची मागणी.
पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

पारनेर तालुक्यात चारा-पाण्याचा तीव्र तुटवडा – मनसेच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांना दिले निवेदन, तातडीने चारा डेपो-टँकरची मागणी.

पारनेर (राजकूमार इकडे) पारनेर: तालुक्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे जनावारांसाठी चारा व पाण्याचा भीषण तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पारनेर तालुकाध्यक्ष अविनाश पवार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पारनेर तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.
दिलेल्या निवेदनात पवार यांनी म्हटले आहे की, गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे, मान्सून लांबल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. जनावारांचा चारा, पाणी व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे.
मनसेच्या दोन प्रमुख मागण्या:
1. चारा डेपो व छावणी : शेतकऱ्यांच्या जनावारांसाठी तातडीने चारा डेपो व छावणी सुरू करावी.
2. पाणी टँकर : पशुधन वाचवण्यासाठी पिण्याच्या पाण्याचे टँकर तातडीने सुरू करावेत.
यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र भाऊ गाडगे, तालुका सचिव नारायण नरवडे, तालुका उपाध्यक्ष विरेंद्र थोरात, पारनेर शहर अध्यक्ष सतीश म्हस्के, सुपा शहर अध्यक्ष अक्षय सूर्यवंशी, बाबु भैय्या कोठावळे, सुरज गोरे यांच्यासह महाराष्ट्र सैनिक पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट~ “शासनाने त्वरित लक्ष देऊन चारा उपलब्ध करण्यासाठी निर्णय घ्यावा. अन्यथा पशुसंवर्धन करण्यासाठी शेतकरी वर्गावर उपासमारीची वेळ येईल या संकटात मनसे शेतकऱ्यांसोबत ठामपणे उभी आहे.” अविनाश मुरलीधर पवार महाराष्ट्र नवनिर्माण सेना पारनेर तालुका अध्यक्ष.




