जावली:-कुडाळ येथे सामाजिक परिवर्तनाची नवी ठिणगी पेटली!
पत्रकार उत्तम भालेराव महाबळेश्वर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION & RPS STAR NEWS NATIONAL PRESIDENT & EDITOR MR. PRALHAD CHAVAN – 8208717483

जावली:-कुडाळ येथे सामाजिक परिवर्तनाची नवी ठिणगी पेटली!

वंचित बहुजन आघाडी ची कुडाळ (ता. जावली) येथील शाखा सातारा जिल्हाध्यक्ष ॲड. दयानंद माने यांच्या हस्ते दिमाखदार वातावरणात उद्घाटन करण्यात आली. या ऐतिहासिक प्रसंगी सातारा जिल्हा उपाध्यक्ष अजित कांबळे, युवा जिल्हाध्यक्ष अमोल गंगावणे, उपजिल्हा युवा अध्यक्ष किरण गायकवाड, जावली तालुका अध्यक्ष प्रताप सपकाळ व त्यांची कार्यकारणी, महाबळेश्वर तालुकाध्यक्ष उत्तम भालेराव, गोगवे गावच्या सरपंच विद्या कदम तसेच भारतीय बौद्ध महासभा चे पदाधिकारी आणि तालुक्यातील विविध शाखांचे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांचे ग्रामस्थांच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन जल्लोषात स्वागत करण्यात आले. व्यासपीठावरून सामाजिक न्याय, संविधानिक हक्क आणि वंचित घटकांच्या सशक्तीकरणाचा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला. “संघटित व्हा, शिक्षित व्हा, संघर्ष करा” हा संदेश देत कार्यकर्त्यांनी सामाजिक परिवर्तनाची मशाल अधिक तेजाने पेटवण्याची शपथ घेतली.
कुडाळ गावातील ही शाखा केवळ उद्घाटन नसून सामाजिक चळवळीचा निर्णायक टप्पा ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. युवक वर्ग, महिला मंडळ, माता-भगिनी आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता जावली तालुक्यात परिवर्तनाची लाट अधिक वेगाने उसळणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले.
वंचितांच्या हक्कांसाठी लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार करत, कुडाळ येथून सामाजिक क्रांतीची नवी सुरुवात झाल्याची भावना सर्वांनी व्यक्त केली.
पत्रकार अध्यक्ष-उत्तम भालेराव आरपीएस स्टार न्युज तालुका महाबळेश्वर




