क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भारती विद्यापीठ:-(पुणे)-विधीसंघर्षग्रस्त बालकाडुन ३ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस – २ दुचाकी चाकी वाहने व १ तीन चाकी रिक्षा जप्त.

पत्रकार अब्दुल रहीम शेख कात्रज शहर अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

विधीसंघर्षग्रस्त बालकाडुन ३ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस – २ दुचाकी चाकी वाहने व १ तीन चाकी रिक्षा जप्त.

भारती विद्यापीठ पोलीसांची धडाकेबाज कामगिरी.

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत वाहन चोरीचे प्रमाण वाढल्यामुळे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी हे वाहन चोरांचा शोध घेत असताना त्यांना एक विधीसंघर्षीत बालक वंडरसिटी रोडवरील मोकळया जागेमध्ये चोरीची रिक्षा व दुचाकी गाडी पार्क करुन थांबला आहे अशी खात्रीशीर माहीती मिळाली.

त्याप्रमाणे नमुद पोलीस अधिकारी व अंमलदार हे वंडरसिटी रोडकडुन सावंत विहारकडे जाणाऱ्या रोडवर गेले असता तेथे एक विधीसंघर्षीत बालक हा एक रिक्षा गाडी क्रमांक MH12.QR.3784 व दुचाकी डिओ गाडी क्रमांक MH12QQ7182 या दोन वाहनांसह मिळुन आल्याने, त्या वाहनांबाबत त्याचेकडे तपास करता त्याने त्याचे साथीदारांसह सदरची वाहने चोरी केल्याचे निष्पन्न झाले असुन, सदरची वाहने जप्त करण्यात आली आहेत. नमुद विधीसंघर्षात बालकाकडे केले तपासामध्ये त्याने त्याचे दोन साथीदारांसह आणखीन होंडा शाईन दुचाकी गाडी क्रमांक MH12KZ6111 ही दुचाकी गाडी चोरी केल्याचे सांगितले आहे.

नमुद विधीसंघर्षीत बालकाकडुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील खालील प्रमाणे वाहन

चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

अ.क्र

गुरनं

कलम

३१८/२०२६

भारतीय न्याय संहीता कलम ३०३ (२)

तीन चाकी रिक्षा

जप्त वाहन

किंमत

१,००,०,०००/-

३१९/२०२६,

भारतीय न्याय संहीता कलम ३०३(२)

MH12.QR.3784 डिओ दुचाकी वाहन

६५,०००/-

४७४/२०२५

भारतीय न्याय संहीता कलम ३०३(२)

MH12QQ7182 शाईन दुचाकी वाहन

७०,०००/-

MH12KZ6111

एकूण – २,३५,०००/- रुपयांची तीन वाहने जप्त करण्यात आली आहे

सदरची कामगिरी मिलींद मोहीते, पोलीस उप आयुक्त परिमंडळ, पुणे शहर, राहूल आवारे, सहाय्यक पोलीस आयुक्त भारती विद्यापीठ विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलोस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कैलास कोडग, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, सचिन सरपाले, अवधुत जमदाडे, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार, संदीप आगळे यांच्या पथकाने केली आहे.

(मानसिंग पाटील) वरीष्ठ पोलीस निरीक्षक

भारती विदयापीठ पोलीस स्टेशन, पुणे शहर

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button