वाई पोलिसांचा मोठा स्फोट; कॉपर चोरी टोळीचा पर्दाफाश!
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION & RPS STAR NEWS NATIONAL PRESIDENT & EDITOR MR. PRALHAD CHAVAN – 8208717483

वाई पोलिसांचा मोठा स्फोट; कॉपर चोरी टोळीचा पर्दाफाश!

वाई प्रतिनिधी सारिका गवते
वाई दि. २४ : वाई परिसरात महावितरणच्या डीपी फोडून तांब्याच्या महागड्या तारांची चोरी करत खळबळ उडवणाऱ्या आंतरतालुका टोळीचा वाई गुन्हे प्रकटीकरण शाखेने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी सहा आरोपींना अटक करत तब्बल १७ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
धोम कॅनॉल परिसरातील डीपींवर सातत्याने होत असलेल्या चोरीमुळे शेतकरी व महावितरण विभाग त्रस्त झाला होता. सीसीटीव्ही व्यवस्था नसतानाही पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारांच्या जाळ्याच्या आधारे आरोपींचा माग काढत अचूक कारवाई केली. ही मोहीम पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये मुकेश माणिक जाधव (रा. मलठण, फलटण), अनिकेत सुभाष बनसोडे (रा. मलठण, फलटण), अर्जुन राजू जाधव (रा. मलठण, फलटण), रोहन लाखन घाडगे (रा. यशवंतनगर, वाई), विजय बाबुराव शिंदे (रा. यशवंतनगर, वाई) आणि मनोज नामदेव घाडगे (रा. यशवंतनगर, वाई) यांचा समावेश आहे. यातील दोन आरोपी यापूर्वी तडीपार करण्यात आलेले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी आरोपींकडून ३०० किलो तांब्याची तार, गुन्ह्यात वापरलेली एक चारचाकी, दोन दुचाकी वाहने व पाच मोबाईल असा एकूण १७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. या धाडसी कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त होत आहे.




