ताज्या घडामोडी

वाई दि. 30 सातारा झोनल ॲथलेटिक्स (मैदानी)स्पर्धेमध्ये किसन वीर महाविद्यालयाचे यश.

पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR

RPS STAR NEWS

वाई दि. 30
सातारा झोनल ॲथलेटिक्स (मैदानी)स्पर्धेमध्ये किसन वीर महाविद्यालयाचे यश.

 

दि.२६ व २७ नोव्हेंबर रोजी छत्रपती शाहू स्टेडियम सातारा श्रीमती मीनलबेन मेहता कॉलेज, पांचगणी आयोजित शिवाजी विद्यापीठ अंतर्गत ६० वी सातारा झोनल ॲथलेटिक्स (मैदानी) स्पर्धे 2024 मध्ये किसन वीर महाविद्यालय, वाईच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेमध्ये महाविद्यालयाचा धावपटू सचिन कुदळे यांनी १०० मी धावणे व ४×१०० रिले या क्रीडा प्रकारांमध्ये सुवर्णपदक प्राप्त केले तसेच या त्यास सातारा झोनल चा ‘वेगवान धावपटू’ म्हणून सन्मानित करण्यात आले. तसेच संग्राम कांयगुडे याने लांब आणि तिहेरी उडी आणि ४×१०० रिले या क्रीडा प्रकारांमध्ये सुवर्णपदक व रौप्य पदक प्राप्त केले. तसेच स्वप्निल कोचळे यांने १०,००० मी धावणे या क्रीडा प्रकारामध्ये रौप्य पदक प्राप्त केले. तसेच महिलांमध्ये महाविद्यालयाची खेळाडू ऐश्वर्या निंबाळकर हिने १०० मी हर्डल्स आणि १०० मी धावणे या क्रीडा प्रकारामध्ये रोप्य रौप्य व कांस्य पदक प्राप्त केले. या स्पर्धेमध्ये पुरुष संघास सांघिक द्वितीय क्रमांक व महिला संघास तृतीय क्रमांक मिळाला. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. त्या खेळाडूंची कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठ इंटर झोन स्पर्धेसाठी निवड झाली. जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले तसेच उपाध्यक्ष मा. शंकरराव गाढवे सचिव, सहसचिव, सर्व संचालक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी खेळाडूंचे व क्रीडा मार्गदर्शक कॅप्टन डॉ समिर पवार, श्री. मनोज शिंदे, श्री. गजानन जाधव आणि श्री. दत्तात्रय काळे यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button