महाबळेश्वर:-वाळणे गावात सौर प्रकाशाचा नवा किरण – चंदनदादा चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न, ग्रामविकासासाठी निधी जाहीर.
संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
वाळणे गावात सौर प्रकाशाचा नवा किरण – चंदनदादा चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न, ग्रामविकासासाठी निधी जाहीर.
वाळणे (ता. महाबळेश्वर) : दाभे गावचे सुपुत्र, इटली येथील यशस्वी उद्योजक श्री. चंदन सुनीता राजाराम चव्हाण व त्यांच्या पत्नी सौ. वर्षाताई चंदन चव्हाण यांच्या शुभहस्ते मौजे वाळणे येथे आधुनिक सौर पथदिव्यांच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. जय गणेश क्रिकेट क्लब, वाळणे यांच्यामार्फत आयोजित क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने चंदनदादांच्या माध्यमातून या सौर पथदिव्यांचे वाटप करण्यात आले होते. अत्यंत उत्साही वातावरणात आणि ग्रामस्थांच्या मोठ्या उपस्थितीत हा भव्य सोहळा पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात श्री. सचिन नलावडे अध्यक्ष कोयना सोळशी कांदाटी क्रिकेट असोशियिशन यांनी चंदनदादांच्या सामाजिक योगदानाचा आढावा घेऊन केली. त्यानंतर श्री. आनंद नलावडे, श्री. रामचंद्र सकपाळ आणि श्री. सुनील नलावडे यांनी आपल्या भाषणातून दादांच्या कार्याची स्तुती करत, त्यांचा विभागातील विकासात असलेला सहभाग अधोरेखित केला.
गावातील युवकांच्या पुढाकाराने राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक, कृषीविषयक व सांस्कृतिक उपक्रमांचे प्रभावी सादरीकरण श्री. प्रशांत तांबे यांनी केले. या उपक्रमांमुळे गावात सकारात्मक बदल घडून येत असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री. शैलेश शिंदे यांनी चंदनदादांच्या आगामी योजनांची माहिती देताना, दादांचा विभागातील विकासाबद्दल असलेला दृष्टीकोन उपस्थितांसमोर मांडला.
या प्रसंगी बोलताना चंदनदादांनी ग्रामस्थांच्या प्रेमळ स्वागताबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि वाळणे गावच्या ग्रामदैवत उत्तेश्वर पद्मावती मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी आर्थिक निधी देण्याची घोषणा करत उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाच्या शेवटी मा. सरपंच श्री. सुनील नलावडे यांनी ग्रामस्थांच्या वतीने चंदनदादांचे मनःपूर्वक आभार मानले आणि त्यांच्या पुढील उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या.
RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.