सातारा जिल्हा ओबीसी समाजासाठी सूचना – 3 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण.
पत्रकार सुशील कुमार पुजारी कराड तालुका उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
सातारा जिल्हा ओबीसी समाजासाठी सूचना – 3 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण.
सातारा जिल्हा ओबीसी समाजासाठी सूचना
सातारा जिल्हा ओबीसी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे लाक्षणिक उपोषण बुधवार दिनांक 3 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते तीन वाजेपर्यंत आयोजित केले आहे. तरी जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकारी तालुका अध्यक्ष यांनी मोठ्या संख्येने आंदोलनामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा अध्यक्ष भरत लोकरे यांनी केले आहे.
*मुख्यमंत्र्यांनी ओबीसींना दिलेला शब्द पाळावा. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्यावे. मराठ्यांचा समावेश ओबीसीआरक्षणात करू नये. या मागणीसाठी हे उपोषण करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. ओबीसी आरक्षणातून जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणुका लढवून सदस्य, सभापती, सरपंच पदी विराजमान झालेल्या आजी माझी सदस्यांनी हा लढा यशस्वी करण्यासाठी आंदोलनात सहभागी व्हावे. फक्त निवडणुका लढवण्यासाठी ओबीसी दाखल्याचा वापर करण्या अगोदर समाजात सामाजिक कामाची आवड निर्माण करून घ्यावी. समाजाच्या आंदोलनात सहभागी होऊन आपले प्रतिनिधित्व दाखवावे.*
*ओबीसीतील नोकरदार वर्ग या आंदोलनापासून नेहमीचअलिप्त राहतो. आपल्या ज्ञानाचा उपयोग करून समाजात संघटने विषयी चर्चा करून संघटनेचे महत्त्व लोकांना पटवून देऊन संघटन बळकट करण्यासाठी आपण कामकरू शकता. आपण आंदोलन यशस्वी करण्यासाठी सातारला जाण्या येण्या साठी ओबीसी बांधवांना वाहन उपलब्ध करून देऊ शकता. त्यामुळे ओबीसी संघटीत होण्यासाठी मदत होईल. प्रत्येकाने आपली नैतिक जबाबदारी सांभाळून या कामास मदत करावी व आंदोलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावेत. असे आवाहन जिल्हा ओबीसी संघटनेचे अध्यक्ष भरत लोकरे यांनी केले आहे.