श्रीरामपूर:-देवळाली प्रवरा मराठा आरक्षणासाठी मुंबई येथे अन्नपाण्याची रसद पुरवण्यासाठी शेटेवाडी परिसरात तिखठ पुऱ्या आंदोलनकर्त्यांना राहुरीतून पुऱ्या रवाना ……
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
देवळाली प्रवरा मराठा आरक्षणासाठी मुंबई येथे अन्नपाण्याची रसद पुरवण्यासाठी शेटेवाडी परिसरात तिखठ पुऱ्या आंदोलनकर्त्यांना राहुरीतून पुऱ्या रवाना ……
श्रीरामपुर ( प्रतिनिधी ) देवळाली प्रवरा ( शेटेवाडी ) व राहुरी फॅक्टरी परिसरातून सकल मराठा समाजातर्फे तिखट पुऱ्या बाटलीबंद पिण्याच्या पाण्याचे शेकडो बॉक्स ‘ चटणी – भाकरी फरसाण असे विविध खाद्यपदार्थांची वाहने आज (रविवारी ) सुरू असलेल्या उपोषण स्थळाकडे रवाना करण्यात आले
मुंबई येथे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर उपोषण सुरू केले आहे त्यांच्या समर्थनार्थ राज्यभरातून लाखो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत परंतू मुंबईतील हॉटेल्स व खाऊ गल्ल्या बंद असल्याने मराठा आंदोलकांची अन्न पाण्याची मोठी समस्या निर्माण झाल्याचे समाज माध्यमांमधून समोर आले त्यांना अन्रपाण्याची रसद पुरविण्यासाठी सामान्य नागरिक सरसावले आहेत देवळाली प्रवरा येथे शेटेवाडी परिसरातील साहित्य आज रात्री मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आले देवळाली प्रवरा शहर व राहुरी फॅक्टरी परिसरात प्रत्येक घरातून एक शिदोरी उपक्रमाद्वारे हजारो भाकऱ्या ‘ शेंगादाना चटणी फरसाण पाणी बाटल्या असा अन्र पदार्थांचा मोठा साठा वाहनांमधून मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आला विविध जाती – धर्मांचे नागरिक सामाजिक कार्यकर्ते विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मराठा आंदोलकांना अन्नपदार्थांची रसद पाठविण्यासाठी परिश्रम घेत आहेत.