चिपळूण:-मोरना विभागातील प्राथमिक शाळेच्या गरजू विद्यार्थ्याना शाही वक्फ कब्रस्थान व ताजिदुलउलूम ट्रस्ट कराड यांच्याकडून शैक्षणिक साहित्याचे वाटप.
पत्रकार अन्सार मुल्ला कराड

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार अन्सार मुल्ला कराड
मोरना विभागातील प्राथमिक शाळेच्या गरजू विद्यार्थ्याना शाही वक्फ कब्रस्थान व ताजिदुलउलूम ट्रस्ट कराड यांच्याकडून शैक्षणिक साहित्याचे वाटप.
दिनांक – 27/7/2023 रोजी प्रत्यक्ष विभागातील शाळांमधे जाऊन गरजू विद्यार्थी मुला मुलींना शालेय दप्तर विविध प्रकारच्या वह्या कंपास व रंग पेट्याचे वाटप शाही वक्फ कब्रस्थान व ताजिदुलउलूम ट्रस्ट कराडचे अध्यक्ष मा. हाजी जैनुद्दिनभादी साहेब यांच्या संकल्पनेतून व ट्रस्टचे सचिव मा. हाजीइसकभाई सवार सामाजिक कार्यकर्ते हाजी बरकात भाई पटवेगर व सहकरी सदस्य यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद मराठी शाळा किल्ले मोरगीरी आंबेघर.पेठ शिवापूर मराठी व पेठशिवापूर उर्दू प्राथमिक शाळेच्या मुख्यद्यापक शिक्षक व ग्रामस्थ यांच्या उपस्थिती मधे सदरचा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी ट्रस्टचे सचिव हाजीइसकभाई सवार यांनी मनोगत व्यक्त करताना आम्हाला या डोंगरी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी माननीय जि. प सदस्य बशीर खोंदू यांनी संबंधित शालेंची मागणी अर्ज घेवून वरील ट्रस्ट कडे मागणी केली. त्याचप्रमाणे आम्ही प्रत्यक्ष वरील शाळांमधे जाऊन पाहिले असता खरोखरच अशा दुर्गम भागातील विद्यार्थी विद्यार्थिनीना याची गरज लक्षात घेवुन खरोखर ग्रामीण भागातील विद्यार्थी हे शेतकरी कुटुंबातील असून ते शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून या ट्रस्ट ने पुढाकार घेवून वरील साहित्याचे गरजू मुलांना वाटप केले.शिक्षण हा सद्याचा युगामध्ये गरजेचे असून शिक्षणाशिवाय पर्याय नाही.या ट्रस्टने सर्व धर्म समभाव या भावणेतून सातारा जिल्ह्यातील विविध शाळांना व इतर गरजूंना मानवता धर्म या नात्याने गेली अनेक वर्ष न वर्षे काम करत आहेत.
त्याचप्रमाणे ट्रस्टचे सदस्य हाजी बरकत भाई पटवेगार यांनी असे म्हंटले की या भागातील मुलांची आर्थिक परिस्थिती पाहता खरोखरच अशा मुलांना ट्रस्ट मार्फत वाटप केले हे आमचे उपकार नसून या ट्रस्टने केलेलं कर्तव्य आहे.या मोराना भागातील अन्य शाळांनाही मागणी नुसार शालेय साहित्य देण्याचे आश्वासन यावेळी दिले.
यावेळी उपस्थित सर्व शाळांचे मुख्याध्यापक.शिक्षक.शाळा व्यवस्थापन कमिटी.सरपंच उपसरपंच. व ग्रामस्थ व शौकतभाई मुल्ला.शहीद बारस्कर.समीर मोमीन बबलू भाई मनेर.बुरान मोमीन व मान्यवर उपस्थित होते.यावेळी आभार मानताना मा.जि.प सदस्य बशीर खोंदु यांनी आमच्या मागणी प्रमाणे गरजू मुलांना शालेय वस्तूचे वाटप केले बद्दल ट्रस्टच्या सर्व सदस्यांचे धन्यवाद देऊन या पुढे ही असेच सहकार्य या विभागातील गरजू मुलांना राहूदे अशी विनंती करून त्यांचे आभार मानले.