ताज्या घडामोडी

सातारा:-ग्रंथ महोत्सवात स्पेन वाचक तर सातारकरांची पाठ…

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS

ग्रंथ महोत्सवात स्पेन वाचक तर सातारकरांची पाठ…

सातारा दि: ग्रंथ हा माणसाला सुसंस्कृत जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करतो. त्यामुळे वाचन संस्कृती, वाचन संस्कृतीचा जागर सुरू करणे गरजेचे आहे. परंतु, साताऱ्यातील ग्रंथ महोत्सवात स्पेन देशातून वाचक आले परंतु सातारकरांनी पाठ का फिरवली? बाबत आता संयोजकांनी कधीतरी आत्मचिंतन करावे. अशी मागणी होऊ लागलेली आहे.
ग्रंथप्रेमी स्वर्गीय डॉक्टर शिवाजीराव चव्हाण, यशवंतराव पाटणे संभाजीराव पाटणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी साताऱ्यात २४ वर्षांपूर्वी ग्रंथ महोत्सवाचे रोपटे लावले. आज त्याचा वटवृक्ष होत असला तरी या ग्रंथ महोत्सवामध्ये नेहमीचेच कलावंत व नेहमीचेच प्रकाशक असा तोच तोच पणा आढळून आलेला आहे.
गेले २४ वर्षाच्या कालावधीमध्ये या ग्रंथ महोत्सवाच्या माध्यमातून सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानात अनेक विधायक उपक्रम राबवले गेले होते. अनेक साहित्यकांनी आपल्या विचाराची शिदोरी दिली. परंतु आता प्रसिद्ध व्यक्ती व शासकीय अधिकारी वर्गाला बोलवून काहीजण हा ग्रंथ महोत्सव अक्षरशा स्वतःची दिंडी काढत असल्याचे टीका होऊ लागलेली आहे. पुस्तक हेच गुरु असल्यामुळे अनेकांनी या ग्रंथदिंडी मध्ये येऊन आपले योगदान दिलेले आहे .
सातारा जिल्हा परिषद मैदानावर उभारण्यात आलेल्या तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी नगरीत २४ वा सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव शालेय विद्यार्थी यांची ग्रंथ दिंडीतील सहभाग हा लक्षणीय होता. परंतु पालक वर्गाने फारसा प्रतिसाद दिला नसल्याची काही अंश का होईना ज्येष्ठ कवी व ज्येष्ठ लेखक प्रवीण दवणे यांनी सुनावले.
स्पेन देशातील बर्लिन या शहरांमध्ये राहणाऱ्या मराठी भाषेचा अभ्यास करून मराठी भाषा सात समुद्राकडे पोहोचवण्याचा ध्यास घेतलेल्या कुमारी अनामिका माळवणकर यांनी या ग्रंथोत्सवाला भेट दिली. ज्येष्ठ पत्रकार व साहित्य तसेच भाषा फाउंडेशनच्या स्वाती राजे यांच्या सहकार्यामुळे मराठी भाषेचे शिक्षण व अभ्यास करणाऱ्या या वाचकांच्या आगमनाने खऱ्या अर्थाने या ग्रंथ महोत्सवाला यश मिळाल्याचे मानले जात आहे. दैनिक सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारिता करणाऱ्या स्वाती राजे या मराठी भाषेच्या संवर्धनासाठी झटत आहेत. आज साताऱ्यात ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत कात्रे, विशाल कदम यांच्या सहकार्यामुळे त्यांची भेट झाली.
मराठी भाषा शिकण्याची जिद्द म्हणून स्पेन देशातून आलेल्या वाचक आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये फिरणाऱ्या सातारकरांना मात्र सातारा जिल्हा परिषदेच्या ग्रंथ महोत्सवात जाऊन सहभागी व्हावे. अशी अपेक्षा आहे. या ग्रंथ महोत्सवामध्ये अनेक मान्यवरांनी भेट दिली असली तरी श्रोते व प्रेक्षक वर्ग जमवणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्या दृष्टीने आता ग्रंथ महोत्सवातील प्रमुख कारभाऱ्यांनी जाणीवपूर्वक लक्ष घालावे . असे आता यानिमित्त सूचित करावे वाटत आहे. समाज माध्यमाच्या माध्यमातून सध्या वाचन संस्कृती रुजवण्याचे काम करावे तितके थोडेच आहे. त्या अर्थाने ग्रंथ महोत्सव आयोजकांचे आभार मानणे आणि त्यामध्ये सक्रिय सहभागी होणे हे आता प्रत्येक छोट्या मोठ्या सामाजिक कार्यकर्त्यांचे परम कर्तव्य ठरणार आहे हे यानिमित्त नमूद करावे वाटत आहे..
…………………………………….. फोटो सातारा जिल्हा परिषदेच्या ग्रंथ महोत्सवातील स्पेन वाचक अनामिका माळवणकर यांचे स्वागत करताना साताऱ्यातील पत्रकार (छाया- निनाद जगताप सातारा)

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button