आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुणे:-आंतरराष्ट्रीय योग दिन विशेष : योग म्हणजे केवळ व्यायाम नव्हे, तर आत्मजागृतीचा मार्ग — वैद्य डॉ.देवेंद्र साठे.

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण - 8208717483

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

आंतरराष्ट्रीय योग दिन विशेष : योग म्हणजे केवळ व्यायाम नव्हे, तर आत्मजागृतीचा मार्ग — वैद्य डॉ. देवेंद्र साठे.

पुणे / वडोदरा
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग एवं प्राकृतिक चिकित्सक तथा पारंपरिक वैद्य वैद्य डॉ. देवेंद्र रामचंद्र साठे (पी.टी.) यांनी योगाचे आध्यात्मिक, मानसिक आणि शारीरिक महत्त्व अधोरेखित करत समाजाला योगाचा खरा अर्थ समजून घेण्याचे आवाहन केले आहे.
डॉ. साठे यांनी सांगितले की, “योग” हा शब्द संस्कृतमधील ‘युज्’ या धातूपासून तयार झाला असून त्याचा अर्थ जोडले जाणे किंवा एकरूप होणे असा आहे. योग म्हणजे केवळ आसने, प्राणायाम किंवा शारीरिक व्यायाम नसून, या संपूर्ण सृष्टीच्या मूलभूत चैतन्यशक्तीशी स्वतःचे एकरूप होणे ही त्यामागील खरी संकल्पना आहे.
त्यांच्या मते, शरीर, मन आणि प्राण यांचे संतुलन साधत अंतर्मनातील चैतन्यशक्तीचा अनुभव घेणे हीच खरी योगसाधना आहे. सिद्धयोग अथवा महायोगाच्या माध्यमातून साधक अंतर्मुख होतो आणि सद्गुरूंच्या कृपेने आत्मसाक्षात्काराच्या दिशेने वाटचाल करू शकतो.
आजच्या धावपळीच्या, तणावपूर्ण आणि तंत्रज्ञानप्रधान जीवनशैलीत योगाचे महत्त्व अधिक वाढले असून, योग केवळ शरीर निरोगी ठेवत नाही तर मनाला स्थैर्य, शांतता आणि आनंदही प्रदान करतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने प्रत्येकाने दररोज किमान नऊ मिनिटे शांतपणे बसून साधना करण्याचा संकल्प करावा, तसेच भारतीय ऋषिमुनींनी दिलेल्या या अमूल्य आध्यात्मिक वारशाचे जतन व संवर्धन करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन डॉ. साठे यांनी केले.
योग ही सर्वांसाठी समान उपलब्ध साधना असून, जात, धर्म, पंथ, लिंग किंवा वय यांचा कोणताही भेद न करता प्रत्येक व्यक्तीला आत्मिक आनंद आणि अंतर्मनातील शांततेचा अनुभव देणारा हा सार्वत्रिक मार्ग असल्याचे त्यांनी नमूद केले.
योग दिनानिमित्त त्यांनी सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देत “शुभं भवतु ।। श्री गुरुदेव दत्त ।।” असा मंगल संदेश दिला.
✍️ वैद्य डॉ. देवेंद्र रामचंद्र साठे (पी.टी.)
योग एवं प्राकृतिक चिकित्सक | पारंपरिक वैद्य
पुणे / वडोदरा

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

 

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button