ताज्या घडामोडी

दहिवडी हद्दीत दारूच्या नशेत जन्मदातीचाच खून…

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS

दहिवडी हद्दीत दारूच्या नशेत जन्मदातीचाच खून…

 

दहिवडी दि: दुष्काळी भागामध्ये पाणी आल्यास खऱ्या अर्थाने माण- खटाव तालुका सुजलाम सुफलाम होईल असं स्वप्न अनेकांनी पाहिले. प्रत्यक्षात मात्र, व्यसनाधीनता वाढल्यामुळे अखेर एका मुलाने दारूच्या नशेत चक्क आपल्या जन्मदात्या आईचा खून केल्याची घटना माण तालुक्यातील दहिवडी येथे घडली. या घटनेमुळे पुन्हा एकदा दारूचा सुळसुळाट असलेल्या माण तालुक्यात दारू मुक्तीचा नारा केव्हा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भाग म्हणून खटाव, माण, कोरेगाव, खंडाळा, फलटण तालुक्याकडे पाहिले जाते. परंतु, सर्वाधिक दुष्काळाची झळ पोहचलेल्या माण तालुक्यात अनेक हुशार भूमिपुत्रांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपले भविष्य घडविले आहे. तर दुसऱ्या बाजूला व्यसनधीनता साथ रोगाने अनेकांचे आयुष्य बरबाद झालेले आहे.
दहिवडी हद्दीत शुक्रवारी दिनांक १० जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास आरोपी विशाल आनंदराव जाधव यांना दारूच्या नशेत आपलीच जन्मदाती आई संगीता आनंदराव जाधव वय ४८ यांचा राहत्या घरात खून केला आहे. आरोपी विशाल जाधव याला दहिवडी पोलिसांनी एका तासातच अटक केली असली तरी त्यांना हे टोकाचा निर्णय का घेतला? दारूच्या व्यसना पाई थेट जन्मदात्या आईवर हल्ला करण्यापर्यंत त्याची मजल का गेली? त्याला रात्री दारू कुठून उपलब्ध झाली. या गोष्टीचाही तपास व्हावा अशी मागणी होत आहे.
दारूच्या नशेमध्ये असलेल्या आरोपी विशाल जाधव हा घरी आल्यानंतर त्याने जेवण मागितले. परंतु तू जेवण हाताने घे. असे सांगताच दारूच्या नशेत त्याने स्टीलच्या हंड्याने आपल्या जन्मदात्या आईला मारहाण करण्यास सुरुवात केली. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे बिचारी आई निपचित पडली. उपचारासाठी तातडीने त्यांना दहिवडी ग्रामीण रुग्णालय व त्यानंतर क्रांतीसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालय सातारा येथे दाखल केले. परंतु त्या मयत झाल्याचे वैद्यकीय तपासणीनंतर स्पष्ट झाले. सदर आरोपी विशाल जाधव हा लपून बसला असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व अधिक चौकशी सुरू केली आहे.
दहिवडी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी अक्षय सोनवणे, यशवंत जमादार, गाढवे, तडस सध्या या आरोपीला न्यायालयांमध्ये पोलीस कोठडी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. वास्तविक पाहता सदर प्रकार हा दारूच्या नशे मुळे घडलेला असल्यामुळे पुन्हा एकदा माण तालुक्यातील बेकायदेशीर दारू व्यवसायाबद्दल दबक्या आवाजात चर्चा सुरू झालेली आहे.


ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button