मुंबई:-“मध्यरात्रीपासून बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप; हक्कासाठी निर्णायक लढा, मुंबईची वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता!”
पत्रकार विजय काळे महाराष्ट्र राज्य सचिव

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

मुंबई:-“मध्यरात्रीपासून बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप; हक्कासाठी निर्णायक लढा, मुंबईची वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता!”

मुंबई | प्रतिनिधी
बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीच्या नेतृत्वाखाली आज झालेल्या भव्य मेळाव्यात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि.18 जून रोजी रात्री १२:०० वाजल्यापासून बेस्ट कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
समितीने सर्व बेस्ट कामगार, पदाधिकारी आणि सहकाऱ्यांना या आंदोलनात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले असून, “हक्काच्या लढाईत एकजूटच विजयाची गुरुकिल्ली आहे,” असा विश्वास व्यक्त केला आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याने संपाला पूर्ण ताकदीने पाठिंबा द्यावा, असे आवाहनही करण्यात आले.
कृती समितीचे नेते नितीन नांदगावकर यांनी सांगितले की, कामगारांच्या न्याय्य मागण्यांसाठी हा संघर्ष असून, मागण्या मान्य होईपर्यंत लढा सुरू राहणार आहे.
घोषवाक्य
“जोराचा जुलूम के खिलाफ, संघर्ष हमारा नारा है!”
“आपली एकता… आपला विजय!”




