आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-नागठाणे येथील मातंग वस्तीसाठी नवीन सांस्कृतिक भवनाच्या उभारणीची मागणी पंचायत समिती सातारा गट विकास अधिकारी यांना निवेदन.

पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

नागठाणे येथील मातंग वस्तीसाठी नवीन सांस्कृतिक भवनाच्या उभारणीची मागणी पंचायत समिती सातारा गट विकास अधिकारी यांना निवेदन.

सातारा: -नागठाणे येथील मातंग वस्तीमधील शासकीय जागेवर असलेले जुने समाजमंदिर अत्यंत जीर्ण अवस्थेत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे त्याच जागेवर नवीन, सुसज्ज सांस्कृतिक भवन उभारण्यात यावे, अशी मागणी पंचायत समितीचे विद्यमान सदस्य श्री.संतोष साळुंखे यांच्या समावेत मातंग वस्तीतील श्री.गुलाब मोहिते, श्री.जगन्नाथ मोहिते, श्री.सयाजी मोहिते, श्री.राजेंद्र मोहिते श्री.लालासो मोहिते व अनेक कार्यकर्त्यांनी केली आहे.
या मागणीसंदर्भात पंचायत समिती सातारा गट विकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले की, सध्या असलेले समाजमंदिर मोडकळीस आले असून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक तसेच विविध समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यासाठी ते अपुरे व धोकादायक ठरत आहे.
त्यामुळे त्याच शासकीय जागेवर सर्व सोयी-सुविधांनी युक्त नवीन सांस्कृतिक भवन उभारण्यात यावे, जेणेकरून मातंग समाजातील नागरिकांना सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांसाठी कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध होईल, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी पंचायत समिती गट विकास अधिकारी यांनी निवेदन स्वीकारून संबंधित विभागामार्फत या मागणीचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले.
मातंग समाजाच्या विकासासाठी आणि सामाजिक उपक्रमांना चालना देण्यासाठी नवीन सांस्कृतिक भवन उभारण्याची मागणी आता प्रशासनाकडून कितपत लवकर पूर्ण होते, याकडे नागठाणे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button