खटाव:-मायणी येथे डिझेल चोरीचे वाढते प्रमाण,; ट्रक चालक हैरान.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक
मायणी येथे डिझेल चोरीचे वाढते प्रमाण,; ट्रक चालक हैरान.
मायणी प्रतिनिधी___मायणी या व्यापारपेठेच्या निमशहरी गावामध्ये डिझेल चोरीचे प्रमाण या वर्षात सर्वाधिक झाल्याने ट्रकचालक हैराण झाल्याचे दिसून येत आहे याबाबत अधिक माहिती अशी की काल मंगळवार रात्री मध्यरात्रीच्या सुमारास येथील ट्रक मालक विजय रामचंद्र देशमुख यांच्या गाडी नंबर एम एच 11 एल 37 21 या गाडीच्या डिझेलच्या टाकीतून कुलूप तोडून सत्तर लिटर डिझेल अज्ञात चोरट्याने पळवले याच्या अगोदर या वर्षात त्यांचे पाच वेळा डिझेल चोरीला गेले आहे याबाबत त्यांनी प्रत्येक वेळी पोलीस स्टेशनला नोंद केली असून त्याचा तपास लागला नाही तसेच दुसरे ट्रक मालक सुहास रघुनाथ इनामदार यांच्या एम एच 11 डीडी 32 76 मधून 40 व एम एच 11 76 32 मधून 30 लिटर चोरट्याने कुलूप तोडून डिझेल लंपास केले सदर गुन्ह्याची नोंद मायनी पोलीस स्टेशनला झाली असून पोलीस कॉन्स्टेबल नाना कारंडे अधिक तपास करीत आहेत