वाई:-विधानसभा प्रमुख योगेश फाळके यांच्या मागणीला यश – वाई शहरातील खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती सुरू.
पत्रकार रेखा येवले सातारा जिल्हा महिला उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
विधानसभा प्रमुख योगेश फाळके यांच्या मागणीला यश – वाई शहरातील खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती सुरू.
वाई शहरातील खड्ड्यांच्या समस्येविषयी त्याच्या दुरुस्ती संदर्भात युवा सेना शिवसेना विधानसभा
वाई-खंडाळा-महाबळेश्वर प्रमुख
योगेश फाळके यांनी पुढाकार घेतला. वाईनगरीच्या मुख्याधिकारी यांना शहरातील रस्त्यांच्या समस्या विषयी निवेदन देण्यात आले होते.
या निवेदनात असे सांगितले होते की वाई नगरपरिषद हद्दीतील महाराणा प्रताप चौक तसेच शहरातील इतर प्रमुख रस्त्यांवर पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले असून, नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीस व सुरक्षिततेस मोठा धोका निर्माण झाला आहे. या खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटनाही घडण्याची शक्यता नाकारता येत निवेदनात असंही म्हटलं गेलं की खड्ड्यांबाबत तातडीने दखल घ्यावी व युद्धपातळीवर कारवाई करावी.
सदर पत्राच्या अनुषंगाने वाई नगरपरिषदेने दखल घेत व त्वरेने कृती करून खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले. अनेक ठिकाणी रस्त्यातील खड्डे बुजवण्यात आले आहेत.योगेश फाळके यांच्या पुढाकाराला अखेर यश आल्याचे पहावयास मिळत आहे.