पुसेसावळी:-चोराडे विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी योगेश पिसाळ यांची निवड.
पत्रकार नितीन कुलकर्णी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
चोराडे विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी योगेश पिसाळ यांची निवड.
खटाव तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वपूर्ण असलेल्या चोराडे गावच्या विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी योगेश सुरेश पिसाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली, चेअरमन नारायण पिसाळ यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त असलेल्या पदावरती योगेश सुरेश पिसाळ यांचा एक अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी योगेश पिसाळ यांची चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली, यावेळी मावळते चेअरमन नारायण पिसाळ,व्हा चेअरमन यशवंत पिसाळ सचिव संजय पिसाळ व सर्व संचालक उपस्थित होते.
चेअरमन योगेश पिसाळ हे अतिशय अभ्यासू सुसंस्कृत असल्याने ग्रामस्थांन मध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे, योगेश पिसाळ हे पुसेसावळी गटाचे नेते सुहास पिसाळ याचे निकटवर्तीय असल्याने सोसायटीला युवा चेअरमन मिळाला आहे, यावेळी माजी खासदार श्रीनिवास पाटील,माजी सहकर मंत्री बाळासाहेब पाटील, कॉग्रेसचे जिल्हा अध्यक्ष रणजितसिंह देशमुख,जितेंद्र पवार, सुरेश बापू, संतोष घार्गे, सुहास पिसाळ,कृष्णत पिसाळ, सुधाकर कुंभार,बापु शेठ पिसाळ , दादासाहेब दगडे रयत क्रांती संघटनेचे खटाव तालुका अध्यक्ष नितीन कुलकर्णी , नवनाथ पिसाळ,पैलवान युवराज पिसाळ व चोराडे ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.