श्रीरामपूर:-सर्वसामान्य माणसाला समजून घेणारी माणसचं सोन्यासारखी – औताडे.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
सर्वसामान्य माणसाला समजून घेणारी माणसचं सोन्यासारखी – औताडे.
श्रीरामपुर ( RPS स्टार न्युज प्रतिनिधी ) खेड्यातील शेतकरी सर्वसामान्य माणूस अनेक समस्यांनी ग्रासलेला असतो त्याला गट तट ‘ पक्ष फार महत्वाचे नसतात . तर सुसहा जगणं हवं असतं ‘ त्याला समजुन घेणारी माणसं हीच खरी सोन्यासारखे होय ‘ असे मत माळेवाडी येथील शेतकरी दत्तात्रय परभत औताडे यांनी व्यक्त केले . येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे विजयादशमीच्या निमित्ताने मायभूमीचे पूजन आणि अन्नदाता शेतकरी यांचा सन्मान करण्यात आला . त्याप्रसंगी दत्तात्रय औताडे बोलत होते . यावेळी माजी प्राचार्य टी . ई . शेळके माजी प्राचार्य डॉ शंकरराव गागरे ‘ डॉ बाबुराव उपाध्ये प्रा . शिवाजीराव बारगळ . सौ अनिताताई औताडे ‘ राहुल औताडे आदी उपस्थित होते प्रारंभी प्राचार्य शेळके यांनी आपल्या शेतात मातीचे पूजन केले . शम्मीचे झाड . पांडव शस्त्रे . रावण दहन आदी कथाभाग सांगितला . प्राचार्य डॉ शंकरराव गागरे यांनी परमपूज्य पांडुरंग शास्त्री यांचे विचार सांगून मनुष्य सांगितले . राहुल औताडे यांनी आभार मानले .