वाई:- मा.चंद्रकांत गुजर पाणीपुरवठा विभाग प्रमुख वाई नगरपरिषद वाई आज सेवानिवृत्त.
संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
आदरणीय चंद्रकांत गुजर साहेब
पाणीपुरवठा विभाग प्रमुख
वाई नगरपरिषद वाई
दि:- 28 फेब्रुवारी सांय 5.00 वा नियत वयोमानानुसार आपल्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत.
वाई शहराचा हक्काचा माणुस सेवेतून निवृत्त होत आहे.कोणताही नागरिक नगरपरिषदेत गेल्यास त्याची अस्थेवाईक पणे चौकशी करुण त्याला योग्य मार्गदर्शन करणार आदरयुक्त व्यक्तीमत्व!
त्यांच्या स्वभावाचे अनेक पैलु वाईकरांनी पाहिले आणि अनुभवले आहेत.पाणिपुरवठा विभागाची जबाबदारी अत्यंत समर्थन पणे संभाळताना कुठेही नागरिकांची गैरसोय होणार नाही हा कटाक्ष त्यांनी नेहमी जोपासला
एक प्रशासकीय अधिकार्याने आपले अधिकार कसे उपभोगावेत याचा आदर्श त्यांनी घालुन दिला. आपली प्रतिभा संपन्न बुद्धीमत्ता त्यांनी सदैव वाईकरांची सेवा करण्यात सार्थकी लावली.
कामाची कोणतीही वेळ न पाळता रात्री अपरात्री त्यांनी नागरिकांच्या सेवेस प्राधान्य दिले
वाईतील प्रत्येक नागरिकाला या व्यक्तीमत्वाचा सार्थ अभिमान आहे.
सामाजिक कार्यात तर सदैव अग्रेसर भुमीका घेऊन तरुणांनी वैधानिक मार्गाने कार्यकरायला हवे हा आदर्श विचार त्यांनी नेहमी जोपासला.संपुर्ण वाई शहरात त्यांच्या कामाची छाप प्रदीर्घकाळ राहिल यात शंका नाही
आज ते सेवानिवृत्त होत आहेत खऱ्या जीवनाला सुरवात करत आहेत परंतु त्यांच्या मधील तळमळीचा कार्यकर्ता त्यांना शांत बसू देणार नाही सेवा निवृत्तीनंतर देखील ते सदैव सामाजिक कार्यात आग्रही राहतील.
शेवटी गुजर साहेब ज्यांना समजले त्यांनाच समजले.
आपल्या सेवानिवृत्तीच्या अनेक शुभेच्छा आपल आरोग्य सदैव निरोगी राहो याच सदिच्छा
💐💐💐💐💐💐💐