क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-भुईंज पोलिसांची चमकदार कामगिरी ; तीन चोरांना उत्तराखंडमधून घेतले ताब्यात.

संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.

भुईंज पोलिसांची चमकदार कामगिरी ; तीन चोरांना उत्तराखंडमधून घेतले ताब्यात.

वाई :-दि.१२/०८/२०२२ रोजी सा.५.१५ वा. चे सुमारास कवठे ता. वाई गावचे हद्दित हॉटेल राज येथे प्रवाशी शिवशाही एस. टी. बस क्रमांक एम.एच-१४- जीडी /८४४० ही थांबली असता एस. टी. बस मधील प्रवाशी यांचे बॅगेतील सुमारे २१,४६,७०८/- रु. किंमतीचे सोन्याचे दागीने चोरीस गेले बाबत अज्ञात आरोपी यांचे विरुध्द भुईंज पोलीस ठाणेत दिनांक- १५/०८/२०२२ रोजी
गुन्हा दाखल करणेत आलेला होता. मा. पो.अ.सातारा अजयकुमार बन्सल, मा. अ.पो.अ.सातारा अजित बो-हाडे व मा. उप वि.पो.अ.वाई विभाग वाई डॉ. शितल जानवे/खराडे, पो.नि. किशोर धुमाळ स्था.गु.शा. सातारा, यांचे मार्गदर्शनाखाली भुईंज पोलीस ठाणेचे प्रभारी आधिकारी आशिष कांबळे यांनी सदर गुन्हयाचा तपास करुन केवळ तांत्रिक माहितीचे आधारावर संशईत आरोपींचा शोध घेवून गुन्हा उघडकीस आणला. सदर गुन्हयामध्ये आरोपी १) महीपाल रामगोपाळ सिंग वय ४० वर्ष, सध्या रा. रामविहार कॉलनी, बी ३२, डेहराडून, राज्य -उत्तराखंड, मुळ रा.रावली ता.जि. बिजनौर, राज्य उत्तरप्रदेश २) वीरबहादुर रमेश सिंग वय ४२ वर्ष रा. खंजाहानपूर, बाकारपुर गढी ता. बिजनौर, जि. बिजनौर, राज्य उत्तरप्रदेश, ३) महेश कुमार दयाराम सिंग वय ३७ वर्ष, रा.रामपूर बकली, ता.जि. बिजनौर, राज्य – उत्तरप्रदेश
यांना उत्तराखंड येथे जावून ताब्यात घेवून त्यांचेकडून सुमारे १७५ ग्रॅम चोरीस गेलेले सोन्याचे दागीने हस्तगत केलेले आहेत. सदर गुन्हयाचे तपासामध्ये भुईंज पोलीस ठाणेचे पोउनि/रत्नदिप भंडारे, सपोफौ/ विकास गंगावणे, पोहवा/ विजय देशमुख, पोना/ प्रशांत शिंदे, पो.ना. अतुल आवळे, पोशि/ रविराज वर्णेकर, पोशि/ सोमनाथ बल्लाळ, पो.शि.सचिन नलवडे, पोशि/ सागर मोहिते, पोशि/मंगेश
आगम तसेच स्था.गु.शा. सातारा चे सपोनि / रमेश गर्जे, पोउनि / अमित पाटील, शरद बेबले, गणेश
कापरे, सचिन ससाने, विशाल पावार, रोहित निकम, प्रवीण कांबळे, प्रविण फडतरे, वैभव सावंत,पृथ्वीराज जाधव, मोहन पवार यांनी मदत केली आहे. गुन्हयाचा तपास पोलीस ठाणेचे प्रभारी आधिकारीआशिष कांबळे हे करीत आहेत.

चौकट : १

स.पो.नि.आशिष कांबळे यांनी भुईंज पोलीस ठाण्याचा पदभार घेतल्यापासून गंभीर गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये त्यांनी स्वतः नेहमीच पुढाकार घेतला आहे. अगदी व्याजवाडीच्या डबल मर्डर प्रकरणातील मुख्य आरोपीला कर्नाटकातून आणण्यासाठी त्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली होती. त्याप्रमाणेच आताही या प्रकरणात उत्तराखंडमध्ये संशयित आरोपी असल्याची माहिती त्यांना मिळाली. संशयितांना जेरबंद करण्यासाठी त्यांनी पुरेपुर जाळे तयार केले. स्वतः ते पथकासमवेत उत्तराखंडमध्ये गेले. वेशांतर करुन संशयितांचा माग काढला. अगदी एखाद्या सिनेमातील कथानकाप्रमाणेच भुईंज पोलीस ठाण्याचे स.पो.नि.आशिष कांबळे यांनी या प्रकरणाचा छडा लावत संशयितांच्या मुसक्या आवळत त्यांना भुईंज पोलीस ठाण्यापर्यंत आणले. भुईंज पोलीस ठाण्याचे स.पो.नि.आशिष कांबळे हे डिटेक्शनमध्ये नंबर वन आहेत. तसेच त्यांची डीबीची टीमही चांगले काम करत असल्याने सातारा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी अनेकदा कौतुक केले आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button