फलटण:-गिरवी भागात नवरात्र उत्सव तयारीची लगबग.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
गिरवी भागात नवरात्र उत्सव तयारीची लगबग.
फलटण:- फलटण ता.गिरवी परिसरातील गिरवी जाधववाडा धुमाळवाडी निरगुडी बोडकेवाडी सासकल दुधेबावी तिरकवाडी जावली आंदरुड मिरढे सोनवडी विचुंर्णी मांडवखडक वडले दालवडी ताथवडा उपळवे वेळोशी सावंतवाडी ढवळ वाखरी या ग्रामीण भागातील महिलांची नवरात्र उत्सव तयारीची लगबग सुरु झाली आहे.
घरातील साफसफाई स्वच्छता कपडे,वाकळी, लेपटी,सतरंजी, अंथरून, पांघरून यांची धुण्यासाठी ओढे नाले यावर व तलावाच्या काठावर कपडे धुण्यासाठी गर्दी झालेली दिसून येते आहे.महिलांना गडी माणसं मदत करताना दिसत आहेत.
नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने खेडेगावात घरादाराची साफसफाई व स्वच्छता करणेचा रिवाज हा नवरात्र उत्सवाच्या प्रथा परंपरा चाली रितीचा पगडा प्राचीन काळापासून चालत आलेला आहे.शेतकरी गाई गुरांच्या गोठ्याची साफसफाई व स्वच्छता करतात.
गिरवी तिरकवाडी धुमाळवाडी निरगुडी बोडकेवाडी सासकल भाडळी दुधेबावी या आठ गावांची भवानीमाता डोंगरावर भवानीमाता मंदिर येथे नवरात्र उत्सव धार्मिक सांस्कृतिक वातावरणात जल्लोषात साजरा करण्यात येतो.
गिरवी गावातून गेली पंचवीस वर्षांपूर्वी पासून गिरवी ते तुळजापूर पायी दिंडी यात्रा उत्सव सोहळा साजरा केला जातो.गिरवी गावातील आई तुळजाभवानी मातेचे भक्त रणजित कदम यांच्या धार्मिक मार्गदर्शनाखाली पंचवीस वर्षांपासून गिरवी भवानीमाता मंदिर ते आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी तुळजापूर पर्यंत पायी चालत वारी करण्याची परंपरा जोपासणारे गिरवी, फलटण,जिंती,फडतरवाडी, साखरवाडी,निरगुडी, सासकल, विंचुर्णी, मांडवखडक, बोडकेवाडी, जाधववाडा, धुमाळवाडी,दुधेबावी,भाडळी तिरकवाडी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने या पायी वारीत सहभागी होतात.




