गिरवी:-(फलटण)-कुस्ती स्पर्धेत श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक शाळा गिरवीचे नेत्रदीपक यश.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
कुस्ती स्पर्धेत श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक शाळा गिरवीचे नेत्रदीपक यश.
गिरवी ( फलटण ):- श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गिरवी, तालुका- फलटण या विद्यालयातील इयत्ता 8 वीत शिकत असणारा समर्थ सूर्यकांत मदने हा विद्यार्थी 14 वर्षाखालील 45 किलो वजन गटात कुस्तीमध्ये तालुका पातळीवर प्रथम क्रमांक मिळवला. तसेच गणेश समीर पवार 17 वर्षाखालील 86 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवला. त्याबरोबर शंभूराज संतोष मदने 79 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवला. यांची जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.
त्याबद्दल जय भवानी एज्युकेशन सोसायटी गिरवी चे अध्यक्ष श्री.सह्याद्रीभैया कदम,संस्थेचे सचिव श्रीमती शारदादेवी कदम, सरपंच सौ वैशाली कदम,श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक शिवराज कदम,विद्यालयाचे प्राचार्य श्री.सावंत एस. व्ही. सर , क्रीडाशिक्षक व मार्गदर्शक श्री.हिंदुराव लोखंडे सर व सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी अभिनंदन केले.




