कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोल्हापूर:-गॅससाठी धावपळ: गृहिणींसह व्यावसायिक हैराण – अजूनही गॅस लवकर मिळणे दुरापास्त : महिलांनी वळवला चुलीकडे मोर्चा.

पत्रकार प्रियदर्शनी चोरगे क्राईम अँड इन्वेस्टीगेशन ऑफिसर महाराष्ट्र राज्य

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

गॅससाठी धावपळ: गृहिणींसह व्यावसायिक हैराण – अजूनही गॅस लवकर मिळणे दुरापास्त : महिलांनी वळवला चुलीकडे मोर्चा.

 क्राईम अँड इन्वेस्टीगेशन ऑफिसर महाराष्ट्र राज्य प्रियदर्शनी चोरगे

                  कोल्हापूर –सध्या सुरू असलेल्या इराण इराक युद्धाचे दुष्परिणाम दिसून येत असून त्याच्या चांगल्याच झळा बसताहेत. या युध्दाचा परिणाम इंधन पुरवठ्यावर दिसून येत आहे, अन्न, पाणी, निवारा या नितांत आवश्यक घटकातील अन्न प्रक्रियेसाठी इंधनाची आवश्यकता आहे. मात्र, घरगुतीसह व्यावसायिक गॅस लवकर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. त्यामुळेच गॅस एजन्सीसमोर रांगा लागत असून कोल्हापुरात काही ठिकाणी रास्ता रोको सारखे प्रकार होताहेत. इंधन तुटवड्यामुळे किंवा अनुपब्धीमुळे गृहिणींसह हॉटेल व्यावसायिक त्रस्त झाले असून गृहिणींनी विविध पर्याय शोधण्यास प्रारंभ केलाय. तर बऱ्याच चहा, वडापाववाल्यांसह हॉटेल व्यावसायिकांनी आपला र्धदा बंद ठेवलाय.

कोल्हापूर जिल्हा पश्चिम महाराष्ट्रातील औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाचा जिल्हा आहे. जिल्ह्याची लोकसंख्या २०२५-२६ नुसार ४३ लाख असून, कामगार वर्ग सुमारे १६००००आहे. दरवर्षी यामध्ये भरच पडत आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसाय,चहा टपऱ्या, वडापाव गाड्या,घरगुती खानावळी इत्यादी तेजीत चालत असतात. गॅस हा नागरी जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. तथापि गेल्या काही दिवसात गॅस टंचाई जाणवू लागल्याने संबंधीत व्यवसाय बंद पडू लागले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोक आणि गृहिणी हवालदिल झाल्या आहेत. यावर मात करताना काही गृहिणींनी लाकूड व कोळसा यावर चालणाऱ्या चुलीचा वापर सुरु केला आहे. दरम्यान, मी घेतलेली चूल काही वेळ चार्ज करावी लागते. तिचा धूर होत नाही. मात्र, लाकडे चांगली पेटतात, त्यावर स्वयंपाक करता येतो, असे गृहिणी प्रियदर्शनी चोरगे यांनी सांगितले.

कोट…
हॉटेल व्यावसायिक व गृहिणी या दोन्ही भूमिका बजावत असताना मी गॅस टंचाईने त्रस्त झाले आहे. घरीही गॅस नाही आणि हॉटेलमधेही नाही. नंबर लावला तरी ४५ दिवस मिळत नाही. बाहेरील चहावाल्यांनी गाड्या बंद केल्या आहेत. रिक्षाचा गॅस महाग झाला आहे. रिक्षा कमी झाल्या आहेत. ज्या आहेत, त्यांनी भाडेदर वाढविले आहेत, सर्वसामान्यांना मिळणारी एकमेव सुखसेवाही परवडेना झाली आहे. लवकरात लवकर युद्ध थांबावे आणि गॅस सेवा सुरळीत सुरू व्हावी, ही श्रींच्या चरणी प्रार्थना.
– प्रियदर्शनी उमेश चोरगे, कोल्हापूर

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button