आंबेगाव:-(पुणे)-०३ गावठी अग्निशस्त्र व ०१ जिवंत काडतूस जप्त करून ०३ आरोपी केले जेरबंद.
पत्रकार अब्दुल रहीम शेख कात्रज शहराध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

आंबेगाव:-(पुणे)-०३ गावठी अग्निशस्त्र व ०१ जिवंत काडतूस जप्त करून ०३ आरोपी केले जेरबंद.

आंबेगाव पोलीसांची धडाकेबाज कामगिरी.
दिनांक १०/०८/२०२६ रोजी आंबेगांव पोलीस स्टेशनकडील अंमलदार ज्ञानेश्वर चित्ते, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, सुभाष मोरे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, जांभुळवाडी पाझरतलावाच्या शेजारी मोकळया जागेत, जांभुळवाडी रोड, शनिनगर, आंबेगाव खु, पुणे या ठिकाणी तीन इसम थांबले असून त्यांच्याजवळ अग्निशस्त्र आहे. प्राप्त बातमीचे अनुषंगाने मा वरिष्ठांचे आदेशान्वये आंबेगांव पोलीस स्टेशनकडील महेश नायकवडी सहायक पोलीस निरीक्षक, तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे, यांनी पथकासह जांभुळवाडी पाझर तलावाच्या शेजारी मोकळ्या जागेत, जांभुळवाडी रोड, शनिनगर, आंबेगाव खु, पुणे येथे सापळा रचुन पुढील आरोपींना शिताफीने पकडुन ताब्यात घेतले.
१) राजन विनोद शहा, धंदा-भाजीविक्री, रा.ठी. फ्लॅट नं.३०२, पोकळे क्रिस्टल सोसायटी, काळभैरवनाथ मंदिरासमोर, धायरीगाव, पुणे.
२) अनिल कैलास चौधरी, वय २६ वर्षे, धंदा-पानटपरी, रा. फ्लॅट नं. १०१, संदेश रेसिडन्सी, धायरीगाव, पुणे.
३) प्रथम अरूण रेणुसे, वय २४ वर्षे, धंदा-गॅरेज, रा. फ्लॅट नं.०२, जाधव हाईटस, भैरवनाथ मंदिराच्यामागे, नाईक आळी, धायरीगाव, पुणे.
सदर आरोपी यांचेकडुन ०१,२०,५००/- रूपये किंमतीचे ०३ गावठी अग्निशस्त्र व ०१ जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. नमुद तिन्ही आरोपींविरुध्द गुन्हा रजिस्टर नंबर ३४१/२०२६, भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३(२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (२) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली असुन आरोपींची दिनांक १४/०८/२०२६ रोजी पर्यंत पोलीस करटडी मंजुर आहे.
सदरची कारवाई मा.श्री. अमितेश कुमार पोलीस आयुक्त साो पुणे शहर, मा.श्री. संजय दराडे पोलीस सह आयुक्त पुणे शहर, मा. श्री. राजेश बनसोडे अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग पुणे, मा. श्री. मिलींद मोहिते पोलीस उपआयुक्त परिमंडळ-२ पुणे शहर व मा. श्री. राहुल आवारे सहाय्यक पोलीस आयुक्त भारती विद्यापीठ विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शरद झिने आंबेगांव पोलीस स्टेशन, चांगदेव सजगणे पोलीस निरीक्षक (गुन्हे), महेश नायकवडी सहायक पोलीस निरीक्षक, युवराज शिंदे पोलीस उपनिरीक्षक, तसेच पोलीस अंमलदार चेतन गोरे, हणमंत मासाळ, हरीश गायकवाड, निलेश जमदाडे, अवधुत जमदाडे, आकाश फासगे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, प्रमोद भोसले, नितीन कातुर्डे, सुभाष मोरे, अजय कामठे, ज्ञानेश्वर चित्ते, शिवाजी पोटोळे, योगेश जगदाळे, राकेश टेकावडे, फिरोज शेख यांच्या पथकाने केली.
(शरद झिने) वरिष्ठ पोलीस निरीक्षक आंबेगाव पोलीस स्टेशन पुणे शहर.





