वाई:-किसन वीर महाविद्यालयात ‘क्षयरोग मुक्त भारत अभियान’ उत्साहात.
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला संघटक

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई:-किसन वीर महाविद्यालयात ‘क्षयरोग मुक्त भारत अभियान’ उत्साहात.

वाई : दि. १० ऑगस्ट २०२६
येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेना, प्राणिशास्त्र विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने ‘क्षयरोग मुक्त भारत अभियान’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सौरभ निंबाळकर, अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, वाई हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे होते. तसेच मा. रविंद्र भिसे, वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक, ग्रामीण रुग्णालय, वाई, उपप्राचार्य प्रो. डॉ. विनोद वीर, मराठी विभाग प्रमुख प्रो.डॉ. चंद्रकांत कांबळे, एन.सी.सी.अधिकारी मेजर.डॉ.समीर पवार, अंतर्गत गुणवत्ता व हमी कक्षाचे समन्वयक प्रा . डॉ. शिवाजी कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी डॉ. सौरभ निंबाळकर यांनी क्षयरोगाचे निर्मूलन करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने जागृत राहण्याचे आवाहन केले.
रविंद्र भिसे यांनी विद्यार्थ्यांना क्षयरोगाविषयी सविस्तर माहिती देत ‘लक्षणे दिसल्यास तपासणी करा आणि उपचार पूर्ण करा’ असा संदेश दिला. तसेच विद्यार्थ्यांना क्षयरोगाची लक्षणे, प्रतिबंध, निदान व उपचार याबाबत मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांनी क्षयरोगमुक्त भारतासाठी जनजागृती, तपासणी आणि योग्य उपचार हाच प्रभावी मार्ग आहे,” असा संदेश दिला विद्यार्थ्यांनी क्षयरोग निर्मूलनाच्या जनजागृतीमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेजर डॉ. समीर पवार यांनी केले. आभार डॉ. शिवाजी ताटे यांनी मानले, तर श्रावणी धनावडे हिने सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. राहुल तायडे , डॉ.अश्विनी शेवाळे, श्री, शरद चव्हाण, दत्तात्रय काळे, प्रदीप जगताप यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी, एन.सी.सी.चे छात्र व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





