पुणे:-(कसबा)-खासदार जनसंपर्क सेवा अभियानात नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तात्काळ उपाययोजना; पुण्यातील उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद.
पत्रकार राजेंद्र पवार हवेली तालुका कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार राजेंद्र पवार हवेली तालुका कार्याध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
खासदार जनसंपर्क सेवा अभियानात नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तात्काळ उपाययोजना; पुण्यातील उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद.
पुणे – कसबा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे त्वरित निराकरण करण्याच्या उद्देशाने केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री तसेच पुण्याचे खासदार मा. श्री. मुरलीधर आण्णा मोहोळ यांच्या पुढाकारातून “खासदार जनसंपर्क सेवा अभियान” राबविण्यात आले.
या अभियानाचा एक भाग म्हणून आज श्री शिवाजी मराठा सोसायटी येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. या वेळी शेकडो नागरिकांनी विविध समस्यांचे निवेदन दिले. पाणीपुरवठा, रस्ते, वीज, निवृत्तीवेतन, आरोग्य व अन्य नागरी सुविधा यांसारख्या बाबतीत नागरिकांनी आपले प्रश्न मांडले, त्यावर तत्काळ निर्णय घेण्यात आले. संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश मा. खासदार मुरलीधर मोहोळ यांनी दिले.
या उपक्रमातून हजारो नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळाला. अनेकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंदाचे भाव दिसून आले, जे या अभियानाच्या यशाचे प्रतीक ठरले.
या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश भाजपचे सरचिटणीस मा. श्री. राजे पांडे, आमदार श्री. हेमंत रासने, पुणे शहराध्यक्ष श्री. धीरज घाटे, मंडल अध्यक्ष श्री. अमित कंक, तसेच छगन बुलाखे, प्रशांत सुर्वे, माजी नगरसेवक, आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
हा उपक्रम केवळ तक्रारी ऐकण्यासाठी नव्हता, तर त्या त्वरित सोडवण्यासाठी आणि प्रशासनाशी थेट संपर्क साधून नागरिकांना दिलासा देण्यासाठी एक प्रभावी माध्यम ठरला.