वाई:-जनता शिक्षण संस्थेच्या हीरक महोत्सवानिमित्त डॉ.सुनीलकुमार लवटे यांचे व्याख्यान.
पत्रकार रेखा येवले सातारा जिल्हा महिला कार्याध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई:-जनता शिक्षण संस्थेच्या हीरक महोत्सवानिमित्त डॉ. सुनीलकुमार लवटे यांचे व्याख्यान.
वाई: दि. ११ ऑगस्ट २०२६
येथील जनता शिक्षण संस्थेची स्थापना १२ जुलै १९६७ रोजी झाली. नुकताच संस्थेचा ५९ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. चालू वर्षी संस्थेने ६० व्या वर्षात पदार्पण केले आहे. या हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त दर महिन्याच्या १२ तारखेला विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ व्यक्तींची विशेष व्याख्याने आयोजित करण्यात येणार आहेत. यातील पहिले पुष्प गुंफण्यासाठी ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे बुधवार दिनांक १२ ऑगस्ट रोजी सकाळी १०:३० वाजता किसन वीर महाविद्यालय प्रांगणात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. संस्थेचे अध्यक्ष मदनदादा भोसले हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. सदर समारंभास संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या विचारांवर महात्मा गांधी, साने गुरुजी व वि.स.खांडेकर यांच्या विचारांचा प्रभाव आहे. ते लेखक, वक्ते, विचारवंत आणि शिक्षणतज्ज्ञ म्हणून महाराष्ट्रात परिचित आहेत. त्यांचे अलीकडील काळातील सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे, ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समग्र वाड्.मय’ या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे अकरा हजार पृष्ठांची सामग्री असलेले १८ खंड त्यांनी प्रकाशित केले असून, त्यात तर्कतीर्थांच्या विश्वकोश नोंदी, भाषणे, लेख, मुलाखती, पत्रव्यवहार, संस्कृत-मराठी प्रबंध व चरित्रे, संस्कृत हस्तलिखित ग्रंथांची विवरण सूची, भारतीय राज्यघटनेचे संस्कृत भाषांतर, प्रस्तावना, पुस्तक परीक्षणे यांचा अंतर्भाव आहे.
कार्यक्रमास वाई पंचक्रोशीतील आजी माजी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून, व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे सचिव डॉ. जयवंत चौधरी यांनी केले आहे.





