श्रीरामपुर तालुक्यातील नाऊर मध्ये आदिवासी दिन उत्साहात साजरा.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

श्रीरामपुर तालुक्यातील नाऊर मध्ये आदिवासी दिन उत्साहात साजरा.

श्रीरामपुर ( RPS स्टार न्युज प्रतिनिधी ) नाऊर येथे ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन उत्साह पूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या प्रारंभी आदिवासी समाजाचे महानायक भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती परंपरा कला आणि सामाजिक योगदान याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच आदिवासी समाजातील युवकांनी शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती साधून समाजाच्या विकासात योगदान यावे असे आवाहन करण्यात आले कार्यक्रमात आदिवासी समाज बांधव महिला युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले पारंपारिक वेशभूषा व संस्कृती कार्यक्रमांनी सोहळ्याची शोभा वाढवली आदिवासी संस्कृतीचे जतन सामाजिक एकोपा आणि शिक्षणातून विकासाचा संदेश देत नाव येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा अध्यक्ष शरद गवळी उपाध्यक्ष राजू माळी कार्याध्यक्ष संजू माळी यांच्या नियोजनां मध्ये नाऊर गावचे लोक नियुक्त सरपंच सौ नंदाताई अहिरे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम प्रारंभ झाला या कार्यक्रमाला गावा माधील सर्वच स्तरातील कार्यकर्ते अधिकारी ग्रामस्थ व महिला मध्ये सुलोचना गवळी छाया गवळी तसेच साईनाथ अहिरे रामनाथ त्रिभुवन योगेश त्रिभुवन RPS स्टार न्युज चे पत्रकार सोमनाथ त्रिभुवन पवार माळी गायकवाड अहिरे यांच्या उपस्थितीत विर एकलव्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन व श्रीफळ फोडून आदिवासी दिन साजरा करण्यात आला





