आरोग्य व शिक्षणकृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई पालिका आरोग्य विभागाचे ६२ स्थाई कर्मचारी आहेत कुठे? जनतेचे आरोग्य धोक्यात; स्वच्छता फक्त कागद रंगवूनच?

पत्रकार नित्यानंद मोरे वाई शहर प्रतिनिधी

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाई पालिका आरोग्य विभागाचे ६२ स्थाई कर्मचारी आहेत कुठे? जनतेचे आरोग्य धोक्यात; स्वच्छता फक्त कागद रंगवूनच?

सातारा वाई.
ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या वाई शहराला घाणीने आणि कचऱ्याने ग्रासले आहे.शहराच्या मुख्य बाजार पेठेत अंतर्गत गल्ली बोळात तसेच वाई पालिकेच्या हद्दीत अनेक ठिकाणी कचरा साचलेला दिसतो त्याची दुर्गंधी ही येत असते.यामुळे वाईच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे.वाई नगरपरिषदेकडे आरोग्य विभागात तब्बल ६२ स्थाई (कायम स्वरुपी ) सफाई कर्मचाऱ्यांचा फौज फाटा असताना वाई शहराची ही दुरावस्था का?असा संतप्त सवाल वाईकर नागरिक करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून वाई शहरात वाई नगरपरिषद हद्दीतअनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग तसेच पडून आलेले पहावयास मिळतात तो कचरा तेथेच सोडून दुर्गंधी पसरलेली असते सध्या पाऊस काळात कचरा भिजून दुर्गंधीचे प्रमाण वाढून डासांचे प्रमाण वाढत असून जनतेला तापाचे, डेंगु ,मलेरिया,पोटाचे विकार या सारख्या आजाराची भिती नागरिकांना सतवू लागली आहे ऐन पावसाळ्यात जर ही परिस्थिती अशीच राहिली तर शहरात साथीच्या आजारांना पसरण्यास वेळ लागणार नाही.
मिळालेल्या माहितीनुसार वाई पालिकेत ६२ स्थाई (कायमस्वरूपी) कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांच्या वेतनावर लाखों रुपये खर्च करण्यात येतात असे असताना वाई शहरात कचऱ्याचे घाणीचे साम्राज्य पहायला मिळते आहे? हे कर्मचारी नेमके कोणाच्या आशिर्वादने कर्तव्यात कसूर करत आहेत? ६२सफाई स्थाई कामगारांपैकी काही १५ ते २० कर्मचारी काम करतांना दिसतात बाकी सर्व कामगार करतात तरी काय? पालिका या कामगारांना दुसरीकडे कामासाठी तर वापरत नाही ना असे असेल तर मग त्याठिकानचे कामगार आहेत कुठे? हा ही प्रश्न नागरिकांना सतवत आहे वाई पालिका शासनाने नियम पायदळी तुडवून वाईकरांच्या आरोग्याशी खेळण्याचे कारण काय? अर्थकारण तर नाही ना?असे अनेक प्रश्न आहेत मात्र पालिकेच्या या भोंगळ कारभार पद्धतीमुळे सर्व सामान्य जनतेला मात्र कचऱ्याच्या, घाणीच्या, दुर्गंधीच्या नरकयातना भोगाव्या लागत आहेत. वाई नगरपरिषदेचा संबंधित अधिकारी वर्ग हा मात्र पेपर रंगवून वाई शहर स्वच्छ असल्याचे दाखवण्यात तरबेज आहेत असे म्हटले तर काही वावगे ठरणार नाही.
यासाठी मा.मुख्याधिकारी, तसेच लोक नियुक्त नगराध्यक्ष. नगरसेवक यांनी लक्ष देणे गरजेचे आहे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते लोक सेवक तसेच सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे.

2)वाईत एफडीऐच्या डोळ्यात धुळ ; ‘ पांढऱ्या कागदात ‘ छुप्या पद्धतीने सुपारीच्या नावाखाली विमल गुटखा विक्री!

वाई.
महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध केलेल्या गुटख्याची वाई शहरात परिसरात अनेक ठिकाणी एका वेगळ्या क्लृप्तीचा वापर करून एका छुप्या पद्धतीने विक्री करत असल्याचा धक्कादायक प्रकार
निदर्शनास येत आहे. अन्न व औषध (FDA) प्रशासनाच्या कारवाया टाळण्यासाठी आता नामवंत ब्रॅंड कंपनीचा विमल गुटखा थेट पांढऱ्या कागदात गुंडाळून ‘ सुपारी ‘ या कोडनेमखाली विकला जात असल्याचे चित्र समोर येत आहे.
यामुळे वाईत एफडीएच्या कायद्याला सर्रास हरताळ फासला जात असल्याचे चित्र समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नुसार पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनची नजर टाळण्यासाठी काही बड्या विक्रेत्यांनी एक वेगळीच शक्कल लढवली आहे.
विमल सारख्या प्रसिद्ध गुटख्याची मुळ पाकीटे ग्राहकांना थेट न दाखवता आधीच विमल आणि तंबाखू एकत्र करून एका पांढऱ्या कागदात बांधून ठेवल्या जातात एखादा खात्रीलायक नेहमीचा ग्राहक आल्यास त्याला ‘सुपारी पाहिजे का?’ असे विचारून या पुड्या दिल्या जातात.यामुळे अचानक पडणाऱ्या छाप्यात केवळ पांढऱ्या कागदी पुड्या दिसत असल्याने प्रशासनाची दिशाभूल करणे सोपे होत आहे.
या छुप्या विक्री मुळे वाई शहरात बाजारपेठेत काही पानटपऱ्यांवर गुटखा विक्री होत असल्याचे दिसून येत आहे.मुळ किंमतीच्या दुप्पट, तिप्पट दराने हा गुटखा विकला जात आहे या छुप्या जाळ्यामुळे तरूण पिढी या गुटख्याच्या व्यसनाच्या आहारी, जात आहे.
कागदी पांढऱ्या पुड्यांच्या नावाखाली सुरू असलेला हा काळा बाजार रोखण्याचे मोठे अहवान प्रशासनाच्या समोर आहे एफडीए केवळ मुख्य पॅकिंग शोधत राहते मात्र या सुपारीच्या नावाखाली पांढऱ्या कागदातील पुड्यांच्या आतून चालू असलेली विमल गुटखा विक्री पकडण्यासाठी एफडीए ने ही वेगळी शक्कल लढवून कारवाई केली पाहिजे असे सर्व सामान्य नागरिकांकडून बोलले जात आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button